वेरळ येथील विद्यार्थ्यांना आपत्तीविषयक मार्गदर्शन
esakal January 17, 2026 05:45 PM

वेरळ येथील विद्यार्थ्यांना
आपत्तीविषयक मार्गदर्शन
खेड, ता. १६ ः लायन्स क्लब ऑफ खेडतर्फे खेड नगरपालिका अग्निशामक केंद्राच्या सहकार्याने खेड वेरळ येथील विद्यार्थ्यांना आगीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, अशा प्रकारची आपत्ती आल्यास काय करावे याबाबत संरक्षणाचे धडे अग्निशमन केंद्राच्या जवानांकडून देण्यात आले. अग्निशमन केंद्राचे अधिकारी देवळेकर व त्यांच्या संपूर्ण टीमने खूप सुंदररित्या या मुलांना त्यांना समजेल अशा भाषेत प्रशिक्षण दिले. या विशेष मुलांसाठी लायन्स क्लबने हा आगळावेगळा असा उपक्रम राबवल्याबद्दल व त्यांना अग्निशामक केंद्र खेडच्या जवानांनी साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.