इनरव्हिल क्लबच्या उत्तरायण कार्निव्हलचे उद्घाटन
esakal January 20, 2026 01:45 PM

‘इनरव्हिल’च्या उत्तरायण
कार्निव्हलचे उद्घाटन
रत्नागिरी : इनरव्हिल क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या उत्तरायण शॉपिंग कार्निवल व फूड फेस्टिवलचे जयेश मंगल पार्क येथे उद्घाटन झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, अॅड. प्रिया लोवलेकर व नगरसेविका मेधा कुळकर्णी उपस्थित होत्या. या सोहळ्याला क्लबच्या प्रेसिडेंट रुचा गांधी, उपाध्यक्ष सुवर्णा चौधरी व खजिनदार श्रद्धा सामंत, डॉ. प्रियांका कांबळे, इव्हेंट अध्यक्ष तन्वी साळुंखे, सहसंयोजक प्रज्ञा पाथरे उपस्थित होत्या. इनरव्हील क्लब हा सामाजिक कार्य करणारा क्लब आहे. या उत्तरायण कार्यक्रमातून येणारा सर्व निधी हा सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे. रत्नागिरीकरांनी या फेस्टिवलमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.