लागोपाट येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाच दिवस मद्याची दुकानं बंद राहणार आहेत. दिल्ली सरकराने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अधिसुचना काढण्यात आली असून पाच दिवस ड्रायडे घोषित करण्यात आला आहे. २६ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान पाच दिवस दिल्लीत मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी असेल, असं उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखणे, धार्मिक भावना जपणे आणि राष्ट्रीय सण उत्सवाची प्रतिष्ठा कायम ठेवणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ड्राय डेच्या दिवशी दिल्लीतील सर्व मद्यविक्रीची दुकाने आणि वेंडर्स पूर्णपणे बंद राहतील, असं या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाचे म्हणजे दिल्ली सरकराने हा निर्णय़ घेतला असला, तरी महाराष्ट्रातही अशाप्रकारचा निर्णय होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे.
Fake Liquor Bottles : भेसळ इंग्लिश नजराणा! नामांकित ब्रँडची दारू विक्री, घरातच काढला कारखानाच; ऐन निवडणुकीत मोठी कारवाई या दिवशी बंद राहतील मद्याची दुकानं२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन
१५ फेब्रुवारी : महाशिवरात्री
२१ मार्च : ईद-उल-फितर
२६ मार्च : राम नवमी
३१ मार्च: महावीर जयंती
ड्राय डेच्या दिवशी हॉटेल व्यावसायिकांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. एल-१५ परवाना असलेली हॉटेल्स विदेशी पर्यटकांना आणि त्यांच्या खोलीमध्ये मद्य सेवा देऊ शकतात. मात्र, हॉटेलच्या बार किंवा रेस्टॉरंटमध्ये बाहेरून येणाऱ्या ग्राहकांना मद्य विक्री किंवा सर्व्ह करण्यास पूर्णतः मनाई असणार आहे.
Bandra Fort Liquor Party: वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टी करतानाचे व्हिडिओ, परवानगी दिली कोणी? | Sakal News नियम मोडल्यास कठोर कारवाईया दिवसांत जर कुणी मद्यविक्री करताना आढळलं, तर त्यांच्यावर कठोर करावाई करण्यात येईल, असं इशारा दिल्ली पोलिसांनी दिला आहे. तसेच संबंधित परवाना रद्द केला जाऊ शकतो किंवा त्याच्यावर मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो, असंही सरकराकडून सांगण्यात आलं आहे. या दिवसांत शहरभर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांकडून विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे.