गडहिंग्लज : गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक शरद पवार व अजित पवार राष्ट्रवादी एकत्रित लढण्याचे एकमत झाले असले, तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात प्रत्येकी ४ जागांवर ‘३-१’ की ‘२-२’ जागा लढवायच्या, या फॉर्म्युल्याची केमिस्ट्री अद्याप जुळलेली नाही.
दरम्यान, उद्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय शक्य आहे. जागा वाटपाबाबत चार ते पाच दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील व शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्यासह प्रमुखांच्या बैठका होत आहेत. kolha
Kolhapur ZP : महापौर टॉस टाळण्यासाठी भाजप आक्रम, ४१ च्या बहुमतासाठी हालचाली; सांगलीत महायुतीची सत्ता निश्चित होणार?दिवसातून तीन ते चार बैठका होऊनही तिढा कायम आहे. ‘३-१’ की ‘२-२’ या फॉर्म्युल्यावरच अजून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. त्याची केमिस्ट्री आजअखेर जुळलेली नव्हती. शरद पवार राष्ट्रवादीकडून ३-१, तर अजित पवार राष्ट्रवादीतर्फे २-२ या फॉर्म्युलावर ठाम असल्याचे कळते.
चंदगडमध्ये अजित पवार राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जिल्हा परिषद गट काँग्रेसच्या गोपाळराव पाटील यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. कोणता गट त्यांना द्यायचा त्यावर त्यांच्यातही अद्याप चर्चा सुरू आहे.
Kolhapur ZP : आमदारकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षपद! प्रा. दिनकरराव मुद्राळे यांचा दुर्मीळ उलटा राजकीय प्रवासदोन्ही तालुक्यांतील पंचायत समितीच्या सोळा गणातील जागा वाटपाबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या, तरी समान संख्येत वाटणीवर एकमत होईल अशी शक्यता आहे. ‘विधानसभे’तील मतांचे गणित..
विधानसभा निवडणुकीत डॉ. बाभूळकर व राजेश पाटील एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. त्या निवडणुकीत कोणत्या जिल्हा परिषद गटातून कोणाला मते जास्त आहेत, तसेच गडहिंग्लज तालुक्यात सरासरी कोणत्या पक्षाला जास्त मते आहेत,
या धर्तीवर फॉर्म्युला राबविण्यासाठी अधिक जोर दिसत आहे. परंतु, ३-१ फॉर्म्युलावर एकमत झाल्याचे एका बाजूने दुजोरा मिळत असला, तरी दुसऱ्या बाजूने मात्र स्पष्ट नकार मिळत आहे. त्यामुळे उद्या (ता. २०) अंतिम निर्णय होईपर्यंत काहीही होऊ शकते, असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.