IND vs NZ 1st T20I : हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन; दोन वर्षांनंतर तगडा खेळाडू परतणार, भारताची संभाव्य Playing XI
esakal January 21, 2026 09:45 AM

India vs New Zealand 1st T20I probable playing XI: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत हार पत्करावी लागली. पण, आता खरी लढाई ट्वेंटी-२० मालिकेतून सुरू होणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उतरण्यापूर्वी भारताची ही शेवटची ट्वेंटी-२० मालिका आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी केलेल्या तयारीची चाचपणी करण्याची ही शेवटची वेळ आहे. या मालिकेपूर्वी तिलक वर्मा व वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाली आहे. तिलक ३ सामन्यांना मुकणार आहे, तर वॉशिंग्टनला संपूर्ण मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याचे वर्ल्ड कप खेळणेही अवघड दिसतेय. हे सर्व संकट असताना आता टीम इंडिया पहिल्या ट्वेंटी-२०त कोणती प्लेइंग इलेव्हन उतरवते याची उत्सुकता आहे.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेदरम्यान तिलकला दुखापत झाली आणि त्याच्या जागी श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाले. श्रेयस डिसेंबर २०२३ मध्ये भारताकडून शेवटचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता. त्याची ट्वेंटी-२० सामन्यांतील कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करताना त्याने १७ सामन्यांत ६०४ धावा करून संघाला फायनलमध्ये पोहोचवले होते. शिवाय आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त त्याने ५१ सामन्यांत ११०४ धावा केल्या आहेत. त्यामुळे तो आता दोन वर्षांनंतर मिळालेल्या संधीचं सोनं करण्यास नक्की उत्सुक असेल.

अजित आगरकरचे धक्कातंत्र! Virat Kohli, रोहित शर्मा यांना बसणार मोठा फटका, BCCI कडे पाठवलाय प्रस्ताव, आता...

मधल्या फळीची जबाबदारी श्रेयस सांभाळणार असताना सलामीला संजू सॅमसन व अभिषेक शर्मा ही जोडी दिसणार आहे. शुभमन गिलला खराब फॉर्मामुळे ट्वेंटी-२० संघातून बाहेर केले गेले आणि त्यामुळे संजूचा सलामीचा मार्ग मोकळा झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव हा मागील बराच काळ फॉर्माशी संघर्ष करतोय आणि त्याला तो पुन्हा मिळवण्यासाठी ही शेवटची संधी आहे. त्याचा फॉर्म ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी महत्त्वाचा आहे. हार्दिक पांड्या सध्या तुफान फॉर्मात आहे, त्याने विजय हजारे ट्रॉफीत आक्रमक फटेकबाजी करून मैदान गाजवले आहे.

वन डे मालिकेत विश्रांती मिळाल्यानंतर तो ट्वेंटी-२० मालिकेतून संघात पुनरागमन करणार आहे. त्याच्यासोबतीला अक्षर पटेल, शिवम दुबे ही अष्टपैलू खेळाडूंची फौज आहे. वॉशिंग्टनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रिंकू सिंगसाठी ही मोठी संधी आहे. तोही पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसेल. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग या जलदगती गोलंदाजांसह वरुण चक्रवर्थी हा फिरकीपटू उद्या खेळेल.

IND vs NZ: भारताला वनडेत सतावलेल्या 'त्या' खेळाडूला न्यूझीलडने T20 मालिकेसाठीही दिली अचानक संधी, कारण घ्या जाणून

भारताची संभाव्या प्लेइंग इलेव्हन - संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्थी, अर्शदीप सिंग

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.