GK – अखंड भारताची लोकसंख्या आज किती असती? आकडा ऐकून चक्रावून जाल
Tv9 Marathi January 21, 2026 09:45 AM

कल्पना करा जर आज भारताची फाळणी झाली नसती भारत अखंड असता, तर भारताची लोकसंख्या किती असती? भारत हा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगातील सर्वात मोठा देश असता, भारतानं लोकसंख्येचे सर्व विक्रम तोडले असते. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश म्हणून चीन नाही तर भारताला ओळखलं गेलं असतं. अखंड भारताच्या संकल्पनेमध्ये एका विशिष्ट सांस्कृतिक आणि भौगोलिक प्रदेशाचा समावेश अभिप्रेत आहे. ज्यामध्ये भारताचं सध्या असलेलं क्षेत्रफळ सोबतच पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान, नेपाळ भूटान, म्यानमार, श्रीलंका आणि मालद्वीव या देशांच्या क्षेत्रफळाचा देखील समावेश करण्यात आला आहे. वीसाव्या शतकात आणि त्यापूर्वी यातील एक एक देश वेगळे होत गेले, आणि सर्वात शेवटी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, आता प्रश्न असा निर्माण होतो की जर आज अखंड भारत असता तर भारताची लोकसंख्या किती असते? चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात.

काय आहे अखंड भारताची संकल्पना

अखंड भारतामध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, भूटान, म्यानमार, श्रीलंका आणि मालदीव या देशाच्या क्षेत्राचा समावेश होतो. इतिहासामध्ये शेकडो वर्ष हा सर्व परिसर भारतालाच जोडलेला होता, आणि या सर्व देशांची ओळख अखंड भारत अशी होती. मात्र त्यानंतरच्या काळात अखंड भारताचे अनेक भागांमध्ये विभाजन झाले, प्रत्येक देशाची संस्कृती देखील बदलली.

अखंड भारताची लोकसंख्या किती असती?

जर आजच्या काळात अखंड भारत असात तर अखंड भारताची लोकसंख्या ही जवळपास  1.9 ते 2.1 अब्जच्या आसपास असती. म्हणजेच अखंड भारताची लोकसंख्या ही 190 ते  210 कोटींच्या आसपास असती. सध्या स्थितीमध्ये एकट्या भारताची लोकसंख्या 143 कोटी इतकी आहे. तर पाकिस्तानची लोकसंख्या 24 ते 25 कोटींच्या आसापास आहे. बांगलादेशची लोकसंख्या 17 कोटी इतकी आहे. या व्यतिरिक्त अफगाणिस्तान, भुटान, नेपाळ, श्रीलंका, मान्यमार अशा छोट्या -मोठ्या देशांची मिळून एकूण लोकसख्या 15 ते 20 कोटींच्या आसपास आहे. अखंड भारत हा क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतमीमध्ये प्रचंड मोठा असता. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.