नरेंद्र महाराज संस्थानतर्फे रक्तदान शिबिर
पेण, ता. २० (वार्ताहर) : स्वामी नरेंद्र महाराज यांच्या संस्थानतर्फे रविवारी (ता. १८) पेण नगरपालिका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात जवळपास एक हजाराहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना अनेकदा रक्ताची गरज भासते. याकरिता जगद्गुरू नरेंद्र रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रक्तदान केले. हे रक्तसंकलन प्रमुख आकाश पाटील, पेण तालुकाध्यक्ष किरण म्हात्रे, उपतालुकाप्रमुख जयवंत घरत, रवींद्र अहेर, संजना पाटील, अनिकेत जोशी, मितेश घरत, प्रणित माळी, प्रतीक पाटील, युक्ती भोईर, रोहित केणी, गंगाधर जोशी, संदेश पाटील आदींसह तालुक्यातील सेवेकरांनी यात सहभाग घेऊन शिबिर यशस्वी केले.