कऱ्हाड: समुद्रातील अत्यंत दुर्मिळ बो माऊथ गिटारफिशची या माशाची शिकार केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. त्या अनुशंगाने वन्यजीव विभागाने दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एक संशयीत साताऱ्यातील आहे. अमीर दस्तगीर नदाफ (रा. मलकापूर) व ओंकार राजेंद्र मेळवणे (रा. गुरुवार पेठ, सातारा) असी त्यांची नावे आङे. त्या दोघांनी शेड्युल एक मधील दुर्मिळ माशाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावंर प्रसारित केला. त्याचे प्रदर्शनही केल्याने त्या दोघां विरोधात वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्यात ‘माण-विद्यापीठ चौक’ मेट्रो चाचणी यशस्वी; एकोणीस किलोमीटरचे काम पूर्ण, मार्चअखेरपर्यंत मार्ग होणार खुला..वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत शेड्युल–१ (भाग ई) मध्ये समाविष्ट असलेला बो माऊथ मासा आंतरराष्ट्रीय स्तरावर आययूसीएन म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर नेचर संस्थेने गंभीर धोक्यात आहे, त्याची प्रजाती संपण्याची भिती आहे, असे असे जाहीर केला आहे. त्यंनी रेड डाटा लिस्टमध्ये समाविष्ट त्या बो माऊथ गिटारफिश माशाचा समावेश केला आहे. तरिही या दुर्मिळ माशाची कऱ्हाड येथे शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
त्यात कऱ्हाड, सातारा येथील दोघांना अटक झाली आहे. त्यात अमीर नदाफ व ओमकार मेळवणे यांनी त्या माशाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला. त्या माशाचे सार्वजनिक प्रदर्शन केले आहे. त्याची माहिती वन्य विभागाला मिळाली होती. त्यंनी मिलालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत दोघांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्या कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, तसेच वनपाल आनंद जगताप, सुनील शिंदे आणि वनरक्षक कैलास सानप, अभिजीत शेळके, अक्षय पाटील, मुकेश राऊळकर यांनी सहभाग घेतला वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अशा दुर्मिळ प्रजातींची शिकार, प्रदर्शन अथवा प्रचार करणे हा गंभीर गुन्हा असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही वनविभागाने दिला आहे.