Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात शिवीगाळ; प्राजक्ता-अनुश्रीमध्ये टोकाचे भांडण, पाहा VIDEO
Saam TV January 21, 2026 06:45 PM

बिग बॉसच्या घरात अनुश्री आणि राकेशमध्ये खूप मोठे भांडण होते.

अनुश्रीने प्राजक्ताला शिव्या दिल्या आहेत.

बिग बॉसच्या घरी ड्युटीवरून वादाला पुन्हाला सुरुवात झाली.

बिग बॉसच्या घरात गेले काही दिवस तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनुश्री मानेने ती झोपेत असताना राकेश बापटने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. यामुळे संपूर्ण घर अनुश्रीच्या विरोधात पाहायला मिळत आहे. तसेच राकेश देखील दुःखावला आहे. अशात आता बिग बॉसच्या घरात शिवीगाळ झाला आहे. ज्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)