भिवंडीतून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता
esakal January 22, 2026 05:45 AM

भिवंडी, ता. २१ (वार्ताहर) : शहरात मुलींच्या बेपत्ता होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच एका घटनेत १७ वर्ष व आठ महिन्यांची अल्पवयीन मुलगी पलक बेपत्ता झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष नगर, कारिवली रोड येथील हलीमा अखलाख अन्सारी यांची मुलगी पलक २३ डिसेंबरला सकाळी सात वाजता शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली; मात्र ती परत घरी आली नाही. शाळा व परिसरात शोध घेतला असता ही सापडली नाही. नंतर, २० जानेवारीला आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, सध्या तिचा शोध सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.