Chhatrapati Shivaji Maharaj Maratha Empire Video : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी निर्माण केलेला दुर्गराज रायगड हा आजही आपल्या सर्वांसाठी कुतूहलाचा आणि अभिमानाचा विषय आहे. नुकताच सोशल मीडियावर SushantChavan7 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रायगड किल्ल्याच्या बांधकामाचे चित्तवेधक दर्शन घडवण्यात आले आहे. या व्हायरल रीलच्या पार्श्वभूमीवर रायगड आणि महाराजांच्या जीवंत चित्र समोर उभ राहत
सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेला हा व्हिडिओ प्रगत AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. हे रील केवळ एक काल्पनिक चित्रण नसून ते आपण आजवर मराठा इतिहास, जुनी पुस्तके आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कथांमधून जे वाचले किंवा ऐकले आहे, त्यावर आधारित आहे. जरी हे चित्रण पूर्णतः ऐतिहासिक पुराव्यांशी मिळतेजुळते नसले तरी, महाराजांनी शून्यातून विश्व कसे उभे केले असेल, याची एक भव्य झलक या माध्यमातून पाहायला मिळते.
View this post on InstagramA post shared by Sushant Suresh Surekha Chavan (@sushantchavan7)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची (पूर्वी रायरी) निवड अत्यंत विचारपूर्वक केली होती. डोंगराचा राजा म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला तिन्ही बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेला आणि चढण्यास अतिशय कठीण होता. "या गडाचा कडा एवढा बेलाग आहे की, गडावर जायला पाखरूही घाबरतं," अशा शब्दांत तत्कालीन बखरींमध्ये त्याचे वर्णन केले आहे. शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी हा किल्ला सर्वोत्तम मानला जात असे.
Numerology : 'या' मूलांकाच्या व्यक्तीचा प्रत्येक निर्णय असतो 'मास्टरस्ट्रोक'! आयुष्यात झटपट मिळवतात यश अन् उच्च पद, डोक्याने सुपरफास्ट हिरोजी इंदुलकर
रायगड किल्ल्याच्या बांधकामाची जबाबदारी महाराजांनी निष्ठावंत वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवली होती. गडावरील भव्य राजसभा, नगारखाना, ध्वजस्तंभ आणि आजही सुस्थितीत असलेली बाजारपेठ हे त्या काळातील प्रगत स्थापत्यशास्त्राचे उत्तम नमुने आहेत. या बांधकामासाठी वापरण्यात आलेले दगड, पाण्याचे व्यवस्थापन आणि गडाची अभेद्य तटबंदी आजही जगभरातील पर्यटकांना आणि इतिहासकारांना मोहित करते.
६ जून १६७४ रोजी याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या घटनेने भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. रायगड केवळ एक किल्ला राहिला नाही, तर तो मराठा साम्राज्याच्या सार्वभौमत्वाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक बनला. गडावर असलेली महाराजांची भव्य राजसभा आणि तिथून मिळणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य स्वराज्याच्या वैभवाची साक्ष देते.
आज रायगड हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. गडावर असलेली महाराजांची समाधी आणि जगदीश्वराचे मंदिर हे आजही ऊर्जा आणि प्रेरणा देतात. सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे नवीन पिढीला आपल्या वैभवशाली इतिहासाची जीवंत ओळख होत आहे.