नारायणगाव, ता. २१ : कुरण (ता. जुन्नर) येथे झालेल्या विभागीय स्तरांवरील व्हॉलिबॉल क्रीडा स्पर्धेत जयहिंद तंत्रनिकेतनच्या मुलांच्या व मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले असून, या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. स्वप्नील पोखरकर यांनी दिली.
इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुलांचे १३, मुलींचे सात असे एकूण २० तंत्रनिकेतनच्या संघांनी भाग घेतला होता. मुलांचा व मुलींचा अंतिम सामना जयहिंद तंत्रनिकेतन विरुद्ध शासकीय तंत्रनिकेतन अवसरी या संघात झाला. या दोन्ही सामन्यात जयहिंद तंत्रनिकेतनने विजेतपद पटकावले व राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला.
खेळाडूंना क्रिडा विभाग प्रमुख प्रा. डी. के आबुज, प्रा. एम. एन. पोकळे, प्रा. के. एस. कामटकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डी. एस. गल्हे यांनी विजयी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
07776