
हिंदू धर्मात पूजा-पाठ करताना टिळा लावण्याची मोठी परंपरा आहे. प्रत्येक शुभ कार्याला कपाळावर टिळा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र अनेकदा घरात वडीलधारी मंडळी टिळा लावताना डोक्यावर हात, रूमाल किंवा टोपी ठेवायला सांगतात. यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे असल्याचे सांगितले जाते. टिळा लावताना डोकं का झाकावे याची कारणे जाणून घेऊया.. ( Why is keeping the head bare considered inauspicious? )
ऊर्जा संवर्धन
शास्त्रानुसार, कपाळावर जिथे आपण टिळा लावतो, तिथे ‘आज्ञाचक्र’ असते. हे शरीरातील ऊर्जेचे महत्त्वाचे केंद्र आहे. टिळा लावताना जेव्हा आपण डोक्यावर हात ठेवतो, तेव्हा एक प्रकारे परिक्रमा पूर्ण होते. डोक्यावर हात ठेवल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर न जाता ती शरीरातच साठवली जाते. चंदन, कुंकू किंवा हळदीचा टिळा लावल्याने मन शांत होते, ज्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते.
एकाग्रता
जेव्हा आपण डोक्यावर हात किंवा टोपी ठेवतो, तेव्हा आपले पूर्ण लक्ष त्या क्रियेवर आणि आज्ञाचक्रावर केंद्रित होते. यामुळे मनातील विचारांचा गोंधळ कमी होतो, मन शांत होते आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मदत होते.
आदराची भावना
भारतीय संस्कृतीत देवाचे नाव घेताना किंवा धार्मिक विधी करताना डोके झाकणे हे आदर आणि नम्रतेचे लक्षण मानले जाते. कपाळावर टिळा लावणे हे देवाप्रती किंवा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक आहे, म्हणून त्या वेळी डोक्यावर हात ठेवून सन्मान दर्शवला जातो.
वैज्ञानिक दृष्टिकोन
जेव्हा रिंग फिंगरने टिळा लावला जातो तेव्हा मध्यभागी असलेल्या मज्जातंतूंवर हलका दाब निर्माण होतो. हे दाब बिंदू मेंदूला शांत ठेवण्यास आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात असे मानले जाते.
हेही वाचा: Number Three : तीन तिघाडा काम बिघाडा असं का म्हणतात?
शास्त्रीय कारण
शास्त्रांमध्ये, डोके उघडे असणे अशुभ मानले जाते. धार्मिक विधी किंवा पूजेच्या वेळी वातावरणात सकारात्मक ऊर्जा असते. असे मानले जाते की डोके उघडे असल्यास ही ऊर्जा टिकवून ठेवणे कठीण जाते. डोके झाकल्यामुळे आपण त्या ऊर्जेप्रती अधिक संवेदनशील होतो.
जुनी प्रथा
जुन्या काळात मंदिर किंवा घरांमध्ये डोकं न झाकता जाणे अयोग्य मानले जात असे. जर जवळ टोपी नसेल, तर तात्पुरता हात ठेवून डोके झाकण्याची पद्धत रूढ झाली, जी आजही पाळली जाते.
( Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ त्याची हमी देत नाही. )