गुलमर्ग
जम्मू काश्मीर येथील हे जागतिक दर्जाचं ठिकाण आहे. उन्हाळ्यात अफरवत, कोंडोरी येथे बर्फ दिसतो.
गोंडोला राईड
मे-जून महिन्यात गोंडोला राईडने उंचावर जाता येतं. इथला अनुभव काही औरच आहे.
सोनमार्ग
जम्मू काश्मिरातलं हे ठिकाण म्हणजे सोन्याचं कुरण आहे. येथे उन्हाळ्यात बर्फाचे डोंगर दिसतात.
ट्रेकिंग
एप्रिल ते जून महिन्यात या ठिकाणी नक्की जा आणि ट्रेकिंगसह स्लेज राईडचा आनंद घ्या.
लेह-लडाख
लडामधलं खारदुंग ला आणि चांग ला ही ठिकाणं म्हणजे पांढराशुभ्र बर्फाचा भाग. येथे उन्हाळ्यातही बर्फ असतो.
पर्यटन
मे महिन्याच्या अखेरीस येथे रस्ते मोकळे होतात आणि पर्यटनाचा मनमुराद आनंद घेता येतो.
झिरो पॉईंट
सिक्कीममध्ये असलेलं हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १५ हजार ५०० फूट उंचावर आहे.
बर्फ
येथे वर्षाचे बाराही महिने बर्फ दिसतो. उंच डोंगरांमुळे हा परिसर पांढराशुभ्र दिसतो.
रोहतांस पास
हिमाचल प्रदेशात मनालीपासून ५० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे.
स्लेजिंग
येथे मे ते जून महिन्यात भरपूर बर्फ असतो. स्कीइंग, स्नो स्कूटर आणि स्लेजिंगचा आनंद येथे घेता येईल.
'या' देशांमध्ये एका रुपयाचे होतात शेकडो रुपये
येथे क्लिक करा