MSCE Exam 2026 : प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख पदाची विभागीय स्पर्धा परीक्षा ३-४ फेब्रुवारीला ऑनलाईन
esakal January 24, 2026 06:45 AM

पुणे : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५" ही परीक्षा येत्या तीन आणि चार फेब्रुवारीला ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.

ही परीक्षा प्रत्येकी तीन सत्रामध्ये आयोजित केली आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने परीक्षार्थींच्या लॉगिनमध्ये लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

तरी परीक्षार्थी उमेदवारांनी वेळोवेळी www.mscepune.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.