प्रजासत्ताक मुख्य सोहळ्याचे आजगाव सरपंचांना निमंत्रण
esakal January 24, 2026 06:45 AM

19574

प्रजासत्ताक मुख्य सोहळ्याचे
आजगाव सरपंचांना निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २३ ः पंचायतराज ग्रामविकास मंत्रालय, भारत सरकारकडून दिल्ली कर्तव्य पथ येथील ७७ व्या प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांना निमंत्रित केले आहे.
महाराष्ट्रामधून सोळा जिल्ह्यांतील १६ सरपंच यासाठी निमंत्रित केले आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र पंचायतराज विभागाचे दोन नोडल अधिकारी असून, त्यांचे २४ ते २६ पर्यंत नवीन महाराष्ट्र सदन येथे वास्तव्य असणार आहे. २५ ला सकाळी पंतप्रधान संग्रहालय येथे भेट, त्यानंतर सायंकाळी सातला पंचायतराज ग्रामविकास मंत्रालयाकडून ग्राम सर्वोदय मासिकाचे प्रकाशन, त्यानंतर देशपातळीवरील स्पर्धेची पारितोषिक वितरण कार्यक्रम पंचायतराज केंद्रीय मंत्र्यांकडून होणार आहे. २६ ला कर्तव्य पथ, दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळ्यास उपस्थिती असा नियोजित कार्यक्रम होणार असून, सौदागर यांना निमंत्रित केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांना सर्वांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.