Bread Pakora Bites Recipe: चहासोबत परफेक्ट! वीकेंडला झटपट तयार होणारे ब्रेड पकोडा बाइट्स, सोपी रेसिपी वाचा
esakal January 24, 2026 02:45 PM

easy bread pakora recipe at home: वीकेंडला सकाळी थोडा उशिरा उठून चहासोबत काहीतरी गरमागरम आणि कुरकुरीत खायची इच्छा असेल तर ब्रेड पकोडा बाइट्स हा एक परफेक्ट पर्याय आहे. कमी वेळात, कमी साहित्य वापरून तयार होणारी ही रेसिपी चवीला जबरदस्त लागते. बाहेरच्या पकोड्यांपेक्षा घरच्या घरी बनवलेले ब्रेड पकोडा बाइट्स अधिक स्वच्छ आणि हेल्दीही असतात.

मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे छोटे बाइट्स आवडतात. चहा, कॉफी किंवा सॉसबरोबर हे पकोडा बाइट्स खाल्ल्यावर वीकेंडची सुरुवात आणखी खास होते. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला खुप सोपी आहे. चला तर मग या वीकेंडला ब्रेड पकोडा बाईट्स नक्की ट्राय करा.

ब्रेड पकोडा बाइट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ब्रेड

लाल तिखट

हळद

गरम मसाला

जीरा पावडर

ब्रेड स्लाइस

बेसण

पाणी

मीठ

तेल

ब्रेड पकोडा बाइट्स बनवण्याची कृती

सर्वात आधी एका भांड्यात उकडलेले बटाटे चांगले बारीक करावे. नंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला,जीरा पावडर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व चांगले मिसळा. नंतर एका भांड्यात बेसण, कोथिंबीर, लाल मिरची, मीठ सर्व मिसळा. नंतर एका ब्रेड स्लाइसवर बटाट्याचे सारण लावावे. नंतर त्यावर दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवावी. नंतर चौकोणी तुकडे करावे. नंतर बेसणाच्या सारणात टाका. नंतर तेल गरम करुन त्यात तळून घ्यावे.

View this post on Instagram

A post shared by Sonika Agonia (@blendserve)