भारताची जागतिक पातळीवर महाआघाडी, अमेरिकेला सर्वात मोठा दणका, थेट जागाच दाखवली…
GH News January 24, 2026 03:14 PM

अमेरिका आणि इराणमधील संबंध सध्या प्रचंड तणावात आहेत. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते. इराणमध्ये सरकारविरोधात आंदोलन सुरू आहेत आणि या आंदोलनाला थेट अमेरिकेने पाठिंबा दिला. तुम्ही विजयाच्या अत्यंत जवळ असून तुमचा लढा अंतिम टप्प्यात आहे, असेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. इराणच्या सरकारने सत्ता सोडावी म्हणून अमेरिका दबाव टाकण्याचे काम करत आहे. आमच्याविरोधात कोणतीही कारवाई केली तर इराणला जगाच्या नकाशावरून हटवू अशी मोठी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवरही मोठा टॅरिफ लावणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आता इराणचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या 39 व्या विशेष सत्रात उपस्थित करण्यात आला. पाश्चात्य देशांनी मांडलेल्या इराणमधील मानवी हक्कांच्या परिस्थितीचा निषेध करणाऱ्या ठरावात भारताने तेहरान (इराण) ला उघडपणे पाठिंबा दिला.

हा एक अत्यंत मोठा दणका भारताने थेटपणे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला दिला. या प्रस्तावात भारत अमेरिकेच्या बाजूने उभा राहिल, असे सर्वांना वाटत असतानाच भारताने मोठा डाव टाकला आणि थेट इराणला जाहीरपणे समर्थन दिले. भारताने फक्त या ठरावाला विरोध केला नाही तर थेट विरोधात NO मतदान देखील केले. युरोपीय गटाला हा मोठा मानावा लागेल.

A/HRC/S-39/L.1 क्रमांकाच्या ठरावावर मतदान घेण्यात आले. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणमधील बिघडत चाललेल्या मानवी हक्कांच्या परिस्थितीचा निषेध करणे होता. पाश्चात्य देशांना संयुक्त राष्ट्रांनी इराणविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी अशी इच्छा होती, परंतु ग्लोबल साउथमधील अनेक महत्त्वाच्या देशांनी याला पाश्चात्य अजेंडा स्पष्ट शब्दात नकार दिला.  यावेळी मतदान झाले.

प्रस्तावाच्या बाजूने (YES) 25 मते तटस्थ 14 मते प्रस्तावाच्या विरोधात (NO) 7 मते

भारताने यादरम्यान जाहीरपणे इराणचे समर्थन केल्याचे बघायला मिळाले. तटस्थ न राहता भारताने थेट NO मतदान केले. NO मतदान करण्यामध्ये भारतासोबतच चीन, पाकिस्तान, इंडोनेशिया, वियतनाम, इराण, क्यूबा या देशांचा समावेश आहे. अमेरिकेच्या विरोधात हे देश मैदानात आली. पहिल्यांदाच असे झाले की, भारत, चीन आणि पाकिस्तान एका बाजूने आहेत. इराणचे थेट समर्थन तिन्ही देशांनी केले.

फ्रांन्स, इटली, जर्मनी युरोपीय यूनियन, स्पेन, युके, जपान, चिली, दक्षिण कोरिया, अर्जेंटिना या देशांनी प्रस्तावाचे समर्थन केले. ब्राझील, दक्षिण ऑफ्रिका, कुवेत, कतार, बांग्लादेश आणि मलेशिया यांनी याबाबत तटस्थ भूमिका घेतली. मुळात म्हणजे इराणसोबत भारताचे जुने चांगले संबंध आहेत. अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता थेट इराणच्या बाजूने भारत उभा राहिला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.