आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या कारणावरून रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी उद्या कोर्टात सुनावणी होणार होती मात्र कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत या प्रकरणाचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे कोणतीही सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरक्षणाची मर्यादा ५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने जिल्हा परिषद निवडणुकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हा विषय सध्या न्यायालयाच्या विचाराधीन आहे. मात्र, संबंधित याचिकेवर उद्याची सुनावणी होणार नसल्याने निवडणुकांच्या प्रक्रियेबाबतचा निर्णय आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख कधी जाहीर होणार, याकडे राज्यातील राजकीय पक्षांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.