मालेगावात प्रजासत्ताक दिनी फुगे विकताना सिलेंडरचा स्फोट, भीषण दुर्घटनेनंतर पोलिसांची धाव; दोन म
Marathi January 27, 2026 09:27 AM

नाशिक : देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशभक्तीचा रंग चढल्याचे पाहायला मिळत आहे. खिशावर तिरंगा, तिरंगी सजावट करुन सर्वत्र उत्साहात ध्वजारोहन झाले. मात्र, नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये (Nashik) तिरंगी रंगाचे फुगे घेताना सिलेंडरचा स्फोट होऊन अपघात घडल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर फुगे घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांजवळ अचानक नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये, 4 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे.

मालेगावातील कॉलेज बस स्टॉप येथे ही घटना घडली. या स्फोटात दोन लहान मुले, दोन महिला आणि एका पुरुषासह एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेत विनोद थोरात,मोहित जाधव,अतुल शेवाळे,प्रमिला यादव आणि उज्वला महाजन हे जखमी झाले आहेत.घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून स्फोटाचे नेमके कारण तपासले जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी खबरदारी म्हणून चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच, अपघातासंदर्भाने काहीही अफवा पसरवल्या जात आहेत, मात्र या दुर्घटनेत कोणीही मृत्यू झाले असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी दर्शन दुग्गड यांनी केलं आहे.

हेही वाचा

बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, ‘सस्पेंड केलं तरी चालेल, पण…

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.