Ajit Pawar Baramati Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचं आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये येत असताना आज (28 जानेवारी) अजित पवार यांच्या विमानाचा लॅंडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघात झाला आणि विमानाने पेट घेतला. अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. (Ajit Pawar Plane Crash) अपघात झाला त्यावेळी अजित पवार यांच्यासह विमानात पाच जण होते. विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक देखील होते. विमानाचा अपघात झाला त्यानंतर अवघ्या काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अचानक समोर आलेल्या या घटनेने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. काल (मंगळवारी, ता २७) अजित पवार कॅबिनेट बैठकीसाठी अजित पवार मुंबईला गेले होते, ते मुंबईतून बारामतीत आल्यानंतर हा अपघात झाला आहे. तर काल त्यांनी मुंबईत केलेली कामे आणि त्यांचा तपशील देखील समोर आला आहे.
अजित पवार कायमच अॅक्शन मोडमध्ये दिसायचे. पहाटेच्या सुमारास ते आपल्या कामाला सुरूवात करायचे. वेळेवर न येणाऱ्या अधिकऱ्यांना ते अनेकदा झापायचे. काल त्यांनी मुंबईतील केलेल्या कामाचा तपशील समोर आला आहे.
🔴मुंबईत असले की अजितदादा सकाळी 8.30 वाजता ते मंत्रालयात येऊन कामकाजाला सुरुवात करत असत.
🔴 कालही सकाळी 8.30 वाजता अजित पवाप मंत्रालयात हजर झाले.
🔴 आलेल्या सर्व फाईल्स त्यांनी क्लिअर केल्या.
🔴 वित्त विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, GST commissioner, excise commissioner यांच्या समवेत या आर्थिक वर्षात राज्याला मिळालेल्या उत्पन्नाचा आढावा त्यांनी घेतला, उत्पन्न वाढीच्या सूचना सर्व सचिवांना दिल्या. ही बैठक दीड तास चालली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसमवेत कॅबिनेट बैठकी संदर्भात चर्चा करून ते कॅबिनेट बैठकीला गेले.
🔴कॅबिनेट बैठक,पायाभूत सुविधा समिती बैठकीला ते उपस्थित राहिले.
🔴त्यानंतर पुन्हा दालनात गेले. तिथे मंत्री चंद्रकांत पाटील व त्यांची चर्चा झाली. दुपारी 2.30 वाजता ते देवगिरीकडे रवाना झाले.
🔴शेवटच्या दिवशीही राज्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठीच ते कार्यरत होते.
अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक
अजित पवार कॅबीनेटच्या बैठकीसाठी ते मुंबईत आलेले होते, त्यानंतर आज ते आज सकाळी ते मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती मिळत आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात आदळलं. विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.(Ajit Pawar Baramati Plane Crash)
या विमानाच्या दुर्दैवी अपघातात अजित पवारांसह एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यामध्ये त्यांचे सुरक्षारक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे. अजित पवार आज बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार महत्त्वाच्या सभांना संबोधित करणार होते, मात्र आज त्यापूर्वीच हा भीषण अपघात झाला.(Ajit Pawar Baramati Plane Crash)
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून (DGCA) या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर नेतेमंडळींना देखील अश्रू अनावर झाले.(Ajit Pawar Baramati Plane Crash)