शुभम देशमुख, भंडारा प्रतिनिधी
wife stabs husband in Bhandara over movie argument : संसार म्हटला की वाद-विवाह हे ओघाने आलेच, पण हाच वाद रक्ताच्या थारोळ्यापर्यंत जाईल असा कुणी विचारही करत नाही. पण भंडाऱ्यात एका किरकोळ कारणावरून एका पत्नीने आपल्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. "पिक्चर पाहताना माझ्या शेजारी का बसला नाही?" याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या पत्नीने आपल्याच कुंकवावर चाकूने वार केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. नवरा-बायकोमध्ये त्या रात्री जे घडलं त्याने संपूर्ण भंडारा जिल्हा हादरला आहे.
चित्रपटाचा वाद रक्ताच्या थारोळ्यातचित्रपट पाहताना सोबत का बसला नाही? या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर पत्नीने पतीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यातीलनाकाडोंगरी येथे घडली आहे. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आशिष शंकर मिश्रा यांनी पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दिली.
भाजी कापण्याच्या चाकूने भोसकलेमिळालेल्या माहितीनुसार, आशिष शंकर मिश्रा (वय ३९, रा. नाकाडोंगरी) आणि त्यांची पत्नी शिवानी मिश्रा यांच्यात वाद झाला. फिर्यादी घरात कपडेबदलत असताना, पत्नीने "तू मला चित्रपट पाहायला नेले, पण तिथे माझ्यासोबत का बसला नाही?" असा जाब विचारत भांडणास सुरुवात केली. वादाचे स्वरूप वाढल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत त्यांचे केस ओढले आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला. इतक्यावरच न थांबता, घरातील भाजी कापण्याचा चाकू घेऊन ती पतीच्या अंगावर धावून आली. आशिषने स्वतःचा बचाव करण्यासाठी बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण चाकूचा वार त्यांच्या डाव्या हाताच्या कोपराच्या वर लागला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हाताला जखम होऊन रक्तस्त्राव झाला.
हृदयद्रावक! स्कूल बसने आजी-नातीला चिरडले, कुशीतील ९ महिन्याचे बाळ चाकाखाली, मुंबईतील मन हेलावणारा VIDEO नवऱ्याची बायकोविरोधात पोलीसांत तक्रार -आशिषने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने त्यांना "भावाच्या हातून उडवून देण्याची" धमकी देखील दिली आहे. या घटनेनंतर आशिष मिश्रा यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. वैद्यकीय अहवाल आणि फिर्यादीच्या जबाबावरून गोबरवाही पोलिसांनी आरोपी शिवानी मिश्रा हिच्याविरुद्ध कलम ११८ (१), ३५२ आणि ३५१ (२)अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Pandharpur Accident : पंढरपूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; डोंबिवलीच्या ४ भाविकांचा मृत्यू, ८ गंभीर