अजित पवार विमान अपघातात गंभीर जखमी, राष्ट्रवादीच्या नेत्याची पहिली मोठी प्रतिक्रिया, मुंबईहून..
Tv9 Marathi January 28, 2026 03:45 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. मुंबईहून बारामतीला जात असताना हा अपघात झाला. लॅंडिंग करताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांच्यासोबत काहीजण या विमानात असल्याची माहिती मिळत आहे. लॅंडिंगदरम्यान हे विमान शेतात कोसळले. घटनास्थळाचे फोटो बघता विमानातून धूर निघत आहे. हे छोटे किमान असून अजित पवार कायमच या विमानाने प्रवास करत. जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीदरम्यान गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचे दाैरे सुरू होते. आज सकाळी बारामतीमध्ये अजित पवारांची सभा होती. मात्र, बारामतीमध्ये पोहोचण्यापूर्वीच हा विमान अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. सध्या विमानाची आग विझवण्याचे काम सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी म्हटले की, आम्हाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. सुदैवाने कोणालाही मोठी हानी झाली नसल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या बाबतीची माहिती आम्ही घेऊ या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादांची धावपळ सुरू आहे. असं कळत आहे की, लॅंडिंगच्या वेळी काहीतरी बिघाड होऊन हा अपघात झाला आहे. चार ते पाच जण जखमी असल्याचीही माहिती मिळत असल्याचे रूपाली पाटील यांनी म्हटले.

अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताची काही व्हिडीओ पुढे आली असून विमान जळून खाक झाले आहेत. या विमानात प्रवास करणारे काहीजण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. फोटो आणि व्हिडीओवरून स्पष्ट होत आहे की, हा अपघात मोठा आहे. अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. या अपघाताची धक्कादायक अशी फोटो पुढे येत होते.

बारामती विमानतळावर लॅंडिंग होत असताना हा अपघात झाला.अजित पवार यांचे काही पीए आणि बॉडीगार्ड या विमानात होते अशी माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच अजित पवार यांचे निकटवर्तीय बारामती विमानतळाकडे जमत आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. अजित पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.