मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अजित पवारांकडे असलेली खाती कुणाकडे द्यावीत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र देण्यात येण्याची शक्यता आहे.
अजित पवारांकडे अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क खात्यांची जबाबदारी होती. ही तीनही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याची असल्याने ती आपल्याकडेच राहावीत यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. त्यामुळे ही खाती राष्ट्रवादीतील कोणत्या मंत्र्याकडे देण्यात यावीत यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
अजितदादांकडे अर्थ खात्यासारखं महत्त्वाचं खातं होतं. त्यामुळे त्यांच्याकडील खाती कुणाकडे द्यावीत यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. त्यानुसार दादांकडे असलेली खाती कुणाला देण्यात यावीत त्याची नावं मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे ही खाती राहण्याची शक्यता आहे. त्याचसोबत एखाद्या आमदाराकडे ही खाती देऊन त्याला मंत्रिपदी घेता येतं का यासाठीही चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा: