राजस्थानमधील कोटपुतली भागातील कोहडा गावात एक प्रसिद्ध भैरू बाबा मंदिर आहे. या मंदिराची ख्याती दूरदूरपर्यंत आहे. हे एक जागृत देवस्थान असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच येथे दरवर्षी 30 जानेवारी रोजी मोठी यात्रा भरते. या यात्रेच्या अगोदर 29 जानेवारी रोजी मोठी कलश यात्रा काढली जाते. आता हीच यात्रा आणि भैरू बाबा मंदिराची एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. या यात्रेतील भाविकांसाठी तब्बल 800 क्विंटलचा चूरमा प्रसाद तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चक्क जेसीबीच्या मदतीने हा चुरमा तयार करण्यात आला असून या प्रक्रियेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
800 क्विंटल चुरमा केला जातो तयारमिळालेल्या माहितीनुसार भैरू बाबा मंदिराची यंदाची ही 17 वी यात्रा आहे. या यात्रेतील भाविकांना प्रसाद म्हणून चुरमा दिला जाणार आहे. हाच चुरमा तयार करण्यासाठी चक्क दोन-दोन जेसीबींची मदत घेण्यात आली आहे. एकाच वेळी तब्बल 800 क्विंटल चुरमा प्रसाद तयार करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र चुरमा प्रसाद तयार करण्याचा हा नवा विक्रम असल्याचे बोलले जात आहे.
मनातील इच्छा होते पूर्णया मंदिरात भैरु महाराजांची एक मूूर्ती आहे. त्या परिसरातील लोकांची या भैरू महाराजांवर खूप श्रद्धा आहे. भैरू बाबांच्या आशीर्वादामुळे सर्व प्रकारची संकटं दूर होतात तसेच मनातील इच्छा पूर्ण होते, असे भक्तगण म्हमतात. त्यामुळेच या यात्रेला दरवर्षी सवाई माधोपूर, ग्वालियर, झालावाड, कोटा, मुरैना या भागातून तसेच मध्यप्रदेश, हरियाणा, दिल्ली या राज्यातील भाविकदेखील या यात्रेत सहभागी होतात. या यात्रेचे संपूर्ण व्यवस्थापन तेथील स्थानिक लोक पाहातत.
स्थानिक लोकच एकत्र येऊन तयार करतात चुरमायह राजस्थान प्रधान है देश… यहां कुछ भी असंभव नहीं है… कोटपुतली में भेरूं बाबा के भोग के लिए 750 क्विंटल चूरमा बना.. थ्रेसर और जेसीबी से यह स्वादिष्ट चूरमा तैयार हुआ…. pic.twitter.com/f1F7vQULwl
— Dinesh Dangi (@dineshdangi84)
यात्रेसाठी मंदिराच्या आसपासची गावे एकत्र येऊन भाविकांसाठी भंडारा, प्रसादाची तजवीज करतात. तसेच सफाई, स्वच्छता, वाहतुकीची या लोकांकडून कालजी घेतली जाते. चुरमा प्रसाद तयार करण्यासाठी इथे कोणालाही पैसे दिले जात नाहीत. स्थानिक लोकच एकत्र येऊन हा प्रसाद तयार करतात. चुरमा करताना दूध, तूप, मनुके, काजू, बदाम यांचा वापर केला जातो. हा प्रसाद साधारण तीन लाख भाविकांना दिला जातो.