swt296.jpg
20675
असलदे ः येथील पीरबाबाचा दर्गा
असलदे येथे उद्या
धार्मिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २९ः असलदे (ता.कणकवली) येथील हजरत असलदे वल्ली युल्ला पिरबाबाचा उर्से मुबारक शनिवारी (ता. ३१) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या उर्स मुबारक निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. दुपारी २ वाजता गौसिया व मदिना मस्जिद येथून पिर बाबाचा संदल निघेल. यावेळी नाते शरीफ, सलाम, पढत नांदगाव तिठा येथे येऊन तिथे दुपारी ३ वाजता रातीब खेळ खेळणार असून सायंकाळी ५ वाजता पिरबाबाची स॑दल तेथून निघून बाबाच्या दर्गा शरीफ येथे चालत पोहचणार आहे. रात्री मगरीब नमाज पठण करून पिर बाबाचा स॑दल दर्गा शरीफ वर चढेल व तिथे दुऑ सलाम नातेशरीफ व नवस बोलणार, नवसफेड, रात्री ८ ते १० वाजेपर्यंत नियाज (प्रसाद) वाढण्यात येईल. रात्री १० वाजता सहिल अली साबरी (गुजरात) विरूद्ध छोटी शबनम (इचलकरंजी) याचा कव्वालीचा खास कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व भाविकांनी उर्स मुबारकचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदगाव उर्स कमिटीतर्फे केले आहे.