मायणीचे सुधीर लोहार स्वामी विवेकानंद युवा पुरस्काराने सन्मानित
esakal January 30, 2026 03:45 AM

स्वामी विवेकानंद युवा पुरस्काराने
मायणीत सुधीर लोहारांचा गाैरव

कलेढोण, ता. २९ : मायणी (ता. खटाव) येथील यश तायक्वांदो स्पोर्ट क्लब संस्थेचे संस्थापक, क्रीडा प्रशिक्षक सुधीर लोहार यांच्या कार्याची दखल घेऊन शिवराज्य ब्रिगेड या संस्थेमार्फत त्यांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री. लोहार यांनी तायक्वांदो स्पोर्ट क्लबच्या वतीने अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत पदके मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. यापैकी अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत कार्यरत आहेत. हायस्कूलमध्ये त्यांनी क्रीडा शिक्षक म्हणूनही उत्कृष्ट कार्य केले आहे. खटाव तालुक्यातील दुष्काळाची, आर्थिकदृष्ट्या मागासलेपण, ग्रामीण भागातील अनेक अडीअडचणी यावर मात करून मायणी व परिसरातील खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात यश संपादन करून देण्यासाठी कार्य केले.
श्री. लोहार यांना मायणी येथील सकल मराठा समाजाचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख यांच्या वतीने शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुरस्कार वितरणासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे उपस्थित होते. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कणसे, स्वप्नील घाडगे, विलास सोमदे, किसन सोमदे, नीलेश लुकडे, मायणी पत्रकार संघाचे अध्यक्ष तानाजी चव्हाण, वैभव थोरात, चंद्रकांत पवार, ग्रामसेवक दिलावर मुलाणी, अरुण माने, डॉ. श्रीखंडे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.


00515
मायणी ः सुधीर लोहार यांचा सत्कार करताना डॉ. विकास देशमुख, डॉ. गोरोबा खुरपे, तानाजी चव्हाण, विलास सोमदे आदी.
.........................................................

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.