दीपिका पादुकोणचं नाव युवराज सिंह आणि महेंद्र सिंह धोनी या क्रिकेटर बरोबर जोडलं गेलं. तेच रणबीर कपूर सोबतच्या तिच्या लव्ह स्टोरीबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. रणबीर कपूर सोबतच्या ब्रेकअपनंतर दीपिका पादुकोण पूर्णपणे कोसळून गेलेली.
त्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंहची एन्ट्री झाली. एका मोठ्या अफेअरनंतर दोघांनी लग्न केलं. आता दोघे सुखात संसार करतायत. रणवीर आणि दीपिका परस्परांना डेट करत असताना दीपिकाच्या एका वक्तव्यावरुन मोठा वाद झाला होता.
मला काय करायचय, काय नाही, कोणासोबत प्रेम करायचय हा तिचा प्रश्न आहे. त्याशिवाय लग्नाआधी शारीरिक संबंधांबद्दलही तिने स्पष्टपणे तिचं मत मांडलं होतं. 2015 साली दीपिका पादुकोण वोग मॅगझीनच्या एक व्हिडिओमध्ये दिसलेली. त्याचं टायटल होतं ‘माय चॉइस’.
हा व्हिडिओ महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी बनवलेला. यात दीपिकाने म्हटलेलं की, मला आपल्या हिशोबाने आयुष्य जगायचं आहे. मला हवे तसे कपडे घालायचे आहेत. पुरुष असो किंवा स्त्री...कोणावर प्रेम करायचं हा माझा प्रश्न आहे असं तिने म्हटलेलं.
दीपिका पादुकोणने लग्नाआधी शारीरिक संबंधांना योग्य ठरवलेलं. लग्नआधी कोणासोबत शारीरिक संबंध ठेवायचे, लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवायचे की नाही...हे माझ्यावर डिपेंड आहे दीपिकाच्या या वक्तव्यावर दोन मतप्रवाह दिसून आलेले. त्यावरुन मोठा वाद झाला होता.