Maharashtra Politics | उपमुख्यमंत्री पदासाठी हालचालींना वेग, राष्ट्रवादी आमदारांची तातडीची बैठक
admin January 30, 2026 07:24 PM
[ad_1]

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता उपमुख्यमंत्री पद कोणाला दिलं जाणार यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्ष ते विरोधकांपर्यंत सर्वांचं लक्ष या निर्णयाकडे लागलं असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत तातडीने बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीत पक्षाची पुढील राजकीय दिशा, नेतृत्वाची जबाबदारी आणि विशेषतः उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय यावर सविस्तर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्याच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाबाबत एकमुखी निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.