Team India Suryakumar Yadav: भारतीय टीमचे खेळाडू न्यूझीलंडविरोधातील पाचव्या आणि अंतिम टी20 सामन्यासाठी तिरुअनन्तपुरम पोहचले. न्युझीलंड विरोधात सामना खेळण्यापूर्वी भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू सकाळीच प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात पोहचले. त्यांनी मंदिरात पूजा केली. प्रार्थना केली. भारतीय खेळाडू हे काल तिरुअनन्तपुरम इथं पोहचले. शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजता हे खेळाडू मंदिरात पोहचले. यावेळी सर्वांनी मनोभावे पूजा केली. या खेळाडूंनी पद्मनाभस्वामींकडे काय मागितले हे त्यांनाच माहिती. पण हे खेळाडू अत्यंत प्रसन्न वाटत होते. सात खेळाडूंनी मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजा केली. भारतीय टीमने न्यूझीलंडविरोधातील मालिकेत दमदार कामगिरी बजावली आहे. सुरुवातीचे तीन सामने टीम इंडिया जिंकली आहे. चौथा सामना न्यूझीलंडने 50 धावांनी जिंकला आहे.
पारंपारिक पोषाखात देवदर्शन
टीम इंडियाच्या खेळाडूंनी मंदिरात जाण्यासाठी पारंपारिक पोशाख घातला होता. मंदिरात दर्शनासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव, ऑलराऊंडर अक्षर पटेल, फलंदाज रिंकु सिंह, वरुण चक्रवर्ती सहभागी झाले होते. याशिवाय गोलंदाज कुलदीप यादव, रवी बिश्नोई, कोच टी दिलीप हे पण मंदिरात होते. या सर्वांनी मनोभावे पूजा केली. यावेळी अखेरच्या आणि निर्णायक सामना जिंकण्याची प्रार्थना केली. मंदिरात खेळाडू जवळपास अर्धातास होते. श्री पद्मनामस्वामी मंदिर हे वास्तूकलेचा अप्रतिम नमुना आहे. येथील नक्षी आणि मंदिराची स्थापत्यकला मनमोहक आहे. हे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. हे मंदिर हिंदू धर्मियांचं एक पवित्र स्थळ आहे. दक्षिण भारतातील केरळ राज्यात हे मंदिर आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघात टी20 चा आंतरराष्ट्रीय अंतिम सामना हा शनिवारी होणार आहे.
संजू सॅमसन होम पिचवर कमाल दाखवणार?
भारत आणि न्युझीलंड यांच्यात पाचवा सामना तिरुअनन्तपुरम येथे होणार आहे. यापूर्वीचे तीन सामने भारताने जिंकले आहेत. तर एक सामना न्यूझीलंडच्या पारड्यात गेला आहे. भारताने हा अखेरचा सामना जिंकला तर मालिका भारत आघाडी घेत खिशात घालेल. या अखेरच्या सामन्यात संजू सॅमसन त्याच्या होमपिचवर कमाल दाखवण्याची शक्यता आहे. तर अक्षर पटेल हा सुद्धा दमदार कामगिरी करेल असा अंदाज आहे. विशाखापट्टणम येथे टी20 चा आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. त्यात भारताने प्रमुख पाच गोलंदाजांना संधी दिली होती. तर ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना गोलंदाजी दिली नव्हती. हा सामना भारताने गमावला. टीम इंडियाने अगोदरच तीन सामने जिंकले आहेत. ही मालिका जिंकली आहे. अखेरच्या सामन्यातही भारतीय संघात मोठा फेरबदल दिसू शकतो.फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संधी मिळण्याची शक्यता आहे.