2 तास 8 मिनिटांचा टॉप-रेटेड सिनेमा; ओटीटीवर येताच ‘नंबर 1’वर होतोय ट्रेंड
admin January 30, 2026 07:25 PM
[ad_1]

प्रेम, उत्कटता आणि स्वप्नं.. 90 च्या दशकातील काळ पुन्हा एकदा पडद्यावर आणणारा चित्रपट नुकताच ओटीटीवर स्ट्रीम होतोय. या चित्रपटाची कथा मनाला भिडणारी आहे. हा चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय. विशेष म्हणजे थिएटरमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र ओटीटीवर त्याला चांगली पसंती मिळतेय. या चित्रपटाची कथा, कलाकार आणि संगीत.. अशा सर्वच गोष्टी सुंदररित्या जमून आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षक-समीक्षकसुद्धा त्याचं कौतुक केल्याशिवाया राहणार नाहीत. म्हणूनच या चित्रपटाला IMDb वर 7.8 रेटिंग मिळालं आहे. जर तुम्ही सुवर्णयुगात परत घेऊन जाणाऱ्या एका उत्तम रोमँटित चित्रपटाच्या शोधात असाल, तर तुम्ही या चित्रपटाला तुमच्या वॉचलिस्टमध्ये आवर्जून समाविष्ट करून घ्या.

या चित्रपटात एका अशा व्यक्तीची कथा दाखवण्यात आली आहे, जो त्याच्या वडिलांचा वारसा जपण्यासाठी खूप प्रयत्न करतो. यासाठी त्याला एकाच व्यक्तीकडून आशा असते आणि जेव्हा तो त्या एकमेव व्यक्तीकडे वळतो, तेव्हा त्याला त्याच्या स्वत:च्या प्रेमाचा सामना करावा लागतो. मग प्रेम आणि वडिलांचा वारसा.. यांच्यातील संघर्ष सुरू होतो. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता, परंतु त्याला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नव्हतं. आता ओटीटीवर मात्र इतर सर्व चित्रपटांना मागे टाकून हा नंबर वन हिट ठरला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘गुस्ताख इश्क’.

 

View this post on Instagram

 

A post shared by JioHotstar (@jiohotstar)

मनीष मल्होत्रा निर्मित ‘गुस्ताख इश्क’चं दिग्दर्शन विभू पुरी यांनी केलं आहे. तर या चित्रपटातील गाणी गुलजार यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात विजय वर्मा, फातिमा सना शेख, नसीरुद्दीन शाह, शारिब हाश्मी आणि नताशा रस्तोगी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा नवाबुद्दीन सैफुद्दीन रहमान उर्फ पप्पनभोवती (विजय वर्मा) फिरते. तो दिल्लीतल्या दर्यागंज इथं राहतो आणि आपल्या वडिलांचा प्रिंटिंग प्रेस वाचवण्यासाठी तो अजीजला (नसीरुद्दीन शाह) भेटण्यासाठी पंजाबला जातो.

पंजाबमध्ये पप्पन अजीजची मुलगी मिन्नी (फातिमा सना शेख) हिच्या प्रेमात पडतो. अजीजचं मन जिंकण्याचा प्रयत्न आणि मिन्नीवर जडलेलं प्रेम यांदरम्यान पप्पन एका अशा अडचणीत सापडतो की त्याला नंतर प्रेम किंवा वडिलांचा वारसा यांपैकी एकाच गोष्टीला निवडावं लागतं. हा चित्रपट 28 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. जर तुम्ही मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहिला नसेल तर जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही तो पाहू शकता. या ओटीटीवर हा चित्रपट सध्या पहिल्या क्रमाकांवर ट्रेंड होतोय.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.