Jacket Types: जॅकेट्सचे ट्रेंडिंग प्रकार; प्रसंगाप्रमाणे करा स्टाईल, मिळेल परफेक्ट लूक
Marathi January 30, 2026 07:28 PM

फॅशनच्या जगात जॅकेटला ‘स्टेटमेंट पीस’ मानले जाते. रात्रीच्या वेळी बाहेर जाताना जॅकेट घालण्यात येते. अगदी ऑफिस, पार्टी ते कॅज्युअल वेअरसाठी जॅकेट चांगला पर्याय ठरते. पण अनेकदा आपण रंगाच्या किंवा डिझाइनच्या मोहात पडून जॅकेट घेतो, जे नंतर आपल्याला शोभून दिसत नाही. तसेच ऋतूंनुसार जॅकेट्सची फॅशन बदलत असते. त्यामुळे जॅकेट्सचे काही स्टायलिश प्रकार जाणून घेऊया… ( Types of jacket for casual and traditional wear )

डेनिम जॅकेट्स

डेनिम जॅकेट कायमच ट्रेंडमध्ये असणारा प्रकार आहे. कारण कोणत्याही प्रसंगी डेनिम जॅकेट्स शोभून दिसतात. अगदी प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये एक तरी डेनिम जॅकेट असायला हवे. उठावदार आणि हटके लूकची आवड असणाऱ्यांसाठी डेनिम जॅकेटचा उत्तम पर्याय ठरतो. डेनिम जॅकेटमधील क्रॉप डेनिम जॅकेट, सिक्विन जॅकेट, जर्सी स्लीव्ह जॅकेट, बटरफ्लाय स्लीव्ह जॅकेट, एंजल स्लीव्ह जॅकेट, फर कॉलर जॅकेट, हुडेड डेनिम जॅकेट असे नानाविविध प्रकार स्टायलिश लूक देतात.

पारंपरिक जॅकेट्स

पारंपरिक भारतीय प्रिंट्स आणि नक्षीकाम असणाऱ्या जॅकेट्सना देखील विशेष मागणी असते. सणसमारंभ अथवा छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी पारंपरिक जॅकेट्स भन्नाट पर्याय ठरतात. सण-समारंभात हेव्ही लूकसाठी सिल्क, कलमकारी, चिकनकारी, वेलवेट, फुलकारी, जयपुरी, खादी, इक्कत, पश्मिना, बांधनी, अज्रक, लेपचा जॅकेट्स स्टाईल करू शकता. यामुळे रॉयल आणि ट्रेडिशनल लूक मिळतो.

लोकरीचे जॅकेट्स

थंडीसोबतच इतर ऋतूंमध्येही लोकरीचे जॅकेट्स वापरले जातात. लोकरीच्या धाग्यांनी तयार केलेल्या या जॅकेटमध्ये असंख्या डिझाईन आणि प्रकार असतात. विशेषतः हाताने विणलेले जॅकेट्स परिधान केल्याने हटके लूक येतो. लोकरीच्या जॅकेट्समध्ये पीप्लम आणि पुलोव्हर जॅकेटला विशेष पसंती मिळते.

हेही वाचा: Bandhani Saree: पारंपरिक लूकसाठी ट्राय करा बांधणी साडी; पाहा नवीन डिझाइन्स

लाँग श्रग्स जॅकेट्स

इतर जॅकेट्सला पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रग जॅकेट्सची तरुणींमध्ये विशेष क्रेझ पाहायला मिळते. टू-पीस पेहरावासोबत लाँग श्रग जॅकेट्स घातल्याने लूक परिपूर्ण होतो. याशिवाय जीन्स, स्किन फिट जीन्स, क्रॉप टॉप्स, शॉर्ट पँट्स, प्लाझो, धोती पँट्स यासोबत लाँग श्रग जॅकेट्सच्या स्टायलिंगचे उत्तम गणित जुळते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.