ठाणे-वडगाव एसटी सुरू
ग्रामस्थांना दिलासा ; चंद्रकांत मोरेंचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३० : तालुक्यातील वडगाव बुद्रूक परिसरातील नागरिकांच्या मागणीवरून ठाणे ते वडगांव ही नवीन एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरू होण्यासाठी चंद्रकांत मोरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे वडगाव येथून प्रवाशांना ठाण्यात थेट जाता येणार आहे.
नवीन सुरू झालेली ही एसटी बससेवा ठाणे स्थानकातून दररोज रात्री ९.३० वा. सुटणार असून, वडगाव येथून दुपारी २ वा. ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहे. या बससेवेमुळे वडगाव तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिकांना ठाणे व मुंबईकडे प्रवास करणे अधिक सोयीचे ठरणार आहे. ही बससेवा सुरू व्हावी यासाठी मोरे यांनी प्रयत्न केले. वडगाव बुद्रूक सेवा संघाच्यावतीने मोरे यांचे कौतुक करण्यात आले आहे. ही बससेवा अविरतपणे सुरू राहण्यासाठी वडगावसह परिसरातील तसेच ठाणे-मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या बससेवेचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त प्रवसीवर्गाने लाभ घेतल्यास ही एसटी सेवा कायमस्वरूपी सुरू राहून वडगावच्या विकासाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.