मुंबई : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या रुग्णालये आणि कार्यालयांत डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू केली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या वित्त विभागाने ‘डिजिटल पेमेंट कलेक्शन सेवा प्रणाली’ उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी आहे.
सध्यामहापालिका रुग्णालये आणि कार्यालयांत डिजिटल पेमेंटची सुविधा नसल्यामुळे अनेक सेवांसाठी नागरिकांना रोख रक्कम द्यावी लागते. खिडक्यांवर लागणाऱ्या लांब रांगा, वारंवार काउंटरवर जावे लागणे आणि सुटे पैसे मिळवण्याची अडचण यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याशिवाय रोख व्यवहारांत पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. अनेक वेळा व्यवहाराची नोंद नसल्यामुळे गैरसमज निर्माण होतात.
Mhada House: म्हाडाची 'ही' घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, रेडीरेकनर आणि मेंटेनन्समुळे घरांच्या किंमतीत मोठी वाढडिजिटल पेमेंटसुरू झाल्यानंतर नागरिकांना रोख रक्कम जवळ बाळगण्याचा त्रास कमी होऊन पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निविदेद्वारे निवडण्यात येणारी एजन्सी यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच क्यूआर कोडवर आधारित पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे महापालिका रुग्णालयांत उपचारासाठी येणारे रुग्ण तसेच रोजच्या सेवांसाठी कार्यालयांत येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्व व्यवहारांची डिजिटल नोंद ठेवता येणार असल्यामुळे आर्थिक व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे.
टप्प्याटप्प्याने सुरुवातवित्त विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही सुविधा महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि कार्यालयांमध्ये लागू केली जाणार आहे. सध्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टी यांसारखे काही व्यवहार ‘माय बीएमसी’ अॅपद्वारे ऑनलाइन करता येतात. रुग्णालये आणि इतर सेवांसाठी अजूनही रोख रक्कम द्यावी लागते. २०१९मध्ये ही सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती योजना रखडली.
Thane Mayor: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कोणाची सत्ता? ठाणे महापौर पदाबाबत शिंदे-फडणवीसांचा मोठा निर्णय; 'या' नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब