Mhada House: म्हाडाची 'ही' घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, रेडीरेकनर आणि मेंटेनन्समुळे घरांच्या किंमतीत मोठी वाढ
esakal January 30, 2026 07:46 PM

मुंबई : कोट्यवधीच्या किमती असल्याने आधीच धूळखात पडलेल्या म्हाडाच्या महागड्या घरांच्या किमतीत आणखी भर पडणार आहे. एप्रिलपासून रेडीरेकनर दरात वाढ झाली आहे. तसेच सदरची घरे गेल्या चार-पाच वर्षांपासून तयार असल्याने त्यांच्या मेंटेनन्सच्या मूळ किमतीत भर पडणार असल्याने आधीच महागड्या असलेल्या घरांच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे ही घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीस काढल्यास मुंबईकर त्याला कितपत प्रतिसाद देणार, असा प्रश्न उभा राहणार आहे.

गृहप्रकल्प राबविताना संबंधित विकसकांनी हौसिंग स्टॉक, प्रीमियमच्या माध्यमातून म्हाडाला ठराविक घरे देणे बंधनकारक आहे. त्यानुसार सर्वच विकसक म्हाडाला घरे देत असून, त्याची लॉटरीच्या माध्यमातून म्हाडा विक्री करते. त्याला मुंबईकरांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो; मात्र गेल्या चार-पाच वर्षांत ताडदेव, लोअर परळ, शिंपोली, पवई अशा ठिकाणी उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये म्हाडाला घरे मिळाली आहेत.

Mira-Bhayandar: डिंपल मेहता, शानू गोहिल, अनिता पाटील की...; मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? 'या' दिवशी निकाल लागणार

ताडदेवच्या क्रिसेंट टाॅवरमध्ये सहा घरे असून, त्याची किंमत प्रत्येकी सहा कोटींहून अधिक आहे, इतर ठिकाणी घरांच्या किमती तीन-चार कोटी रुपयांहून अधिक आहेत. म्हाडानेया घरांचा यापूर्वीही लाॅटरीत समावेश केला होता, पण किंमत जास्त असल्याने खरेदीसाठी कोणी पुढे आले नाही. आता मात्र वाढीव रेडीरेकनर आणि मेंटेनन्समुळे या घरांच्या किमती आणखी वाढणार आहेत.

फेब्रुवारीत लॉटरी

महागड्या घरांची लाॅटरीच्या माध्यमातून विक्री होत नाही. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विक्री केली जाणार आहे. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात जाहिरात काढली जाणार आहे. घरखरेदीसाठी मुंबईकर पुढे येणार का, हा प्रश्न असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.