Kolhapur Tourism: कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जाण्याचं प्लॅन करताय? मग 'या' 5 ठिकाणी SUNSET नक्की अनुभवा...
esakal January 30, 2026 07:46 PM

Kolhapur Sunset Points: जर तुम्ही फॅमिलीसोबत कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला शनिवार- रविवारी जात असाल, तर रंकाळा तलावासह काही खास ठिकाणांना भेट देणे नक्कीच तुमच्या ट्रिपला खास बनवेल. कोल्हापूर केवळ ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले शहर नाही, तर येथे तांबडा पांढरा रसा, सुंदर निसर्गरम्य ठिकाणे, आणि अद्भुत सूर्यास्त अनुभव घेता येतो.

कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, अंबाबाई म्हणून ओळखली जाणारी, हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अत्यंत महत्वाचे पीठ आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असल्यामुळे अनेक भाविक लांबून दर्शनासाठी येथे येतात. जर तुम्ही या विकेंडला देवीचे दर्शन झाल्यावर फिरण्याचा विचार करत असाल तर या खास ठिकाणी नक्की भेट द्या.

Friday Pradosh Vrat: शुक्रवारी प्रदोष व्रताचा दुर्मिळ योग, 'या' उपायांनी मिळेल शिव–लक्ष्मीची विशेष कृपा! रंकाळा तलाव

महालक्ष्मी मंदिरच्या जवळ असलेलं रंकाळा तलाव हे शहरातील प्रमुख पिकनिक स्पॉट आहे. तलावाजवळ फेरफटका मारताना, बोटिंगचा अनुभव घेऊन संध्याकाळी सूर्याचे सोनेरी प्रकाश पाण्यावर पडताना पाहणे खूप खास असते.

पन्हाळगड

पन्हाळगड किल्ला आणि त्याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे फॅमिली ट्रीपसाठी परफेक्ट आहेत. किल्ल्याच्या वरून सूर्यास्त पाहताना संपूर्ण परिसराचा सुंदर दृश्य अनुभवायला मिळतो.

पंचगंगा घाट

पंचगंगा घाट हे शहरापासून जवळचे ठिकाण असून, संध्याकाळी इथून सूर्यास्ताचा अनुभव अत्यंत रम्य असतो. हिरवीगार परिसर आणि शांत वातावरण फॅमिलीसोबत आनंददायक आहे.

मोरजाई पठार, तुमजाई पठार, तामजाई पठार

हे पठार शौकिया टेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाणे आहेत. पठारावरून सूर्यस्ताचा अनुभव अगदी अविस्मरणीय असतो, विशेषतः फॅमिली सोबत थोडा वेळ हिरवळीच्या कुशीत घालवायला.

कळंबा तलाव आणि पाझर तलाव (कागल)

कळंबा आणि पाझर तलाव दोन्ही शांत तलाव आहेत जिथे सूर्यास्ताचे दृश्य अगदी मनमोहक असते. पिकनिकसाठी, फॅमिलीसोबत फेरफटका मारण्यासाठी आणि फोटोसाठी हे उत्तम ठिकाण आहेत.

Asherigad Fort Trek: ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींना आवडेल असा ‘अशेरीगड’ ; कसा पोहोचाल ते जाणून घ्या काळम्मावाडी राधनगरी

काळम्मावाडी राधनगरी परिसरातील निसर्गरम्य दृश्ये आणि पर्वतीय रेषा सूर्यास्ताच्या वेळेस अप्रतिम दृश्य देतात. शहराच्या गजबजाटापासून थोडा वेळ तरी दूर राहून या ठिकाणी सूर्यास्ताचा अनुभव घेणे खूप खास ठरते.

मसाई पठार

मसाई पठार हे थोडेसे उंचावर असून, इथून सूर्यास्ताचे दृश्य अतिशय विस्तृत आणि मनमोहन दिसते. फॅमिलीसोबत सूर्यास्त पाहताना शांत वेळ घालवता येतो. आणि निसर्गाचा आनंद मिळतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.