Chhagan Bhujbal meets Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तिसऱ्या दिवसापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या भेटीमागील नेमकं कारण समोर आलं नसलं तरी अजित पवार यांच्या खात्यांची जबाबदारी कोणाला द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदासाठी कोणाचे नाव पुढे येईल याबाबतही चर्चा होणार आहे.
या प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून पक्षातील नेतृत्वाची जबाबदारी आणि राज्य मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याबाबत हालचाली वेगाने सुरू आहेत.
Ajit Pawar Asthi Visarjan : अजित दादांचे अस्थी विसर्जन, पार्थ व जय पवार यांच्याकडून अस्थी विसर्जन विधी संपन्नराज्यातील महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा महत्त्वाचा घटक पक्ष असून नेतृत्वातील पोकळी भरून काढण्यासाठी कोणता निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.