Praful Patel elected as the president of the Nationalist Congress Party: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची थेट माहिती केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याचा सुगावा लागताच काल ट्विट करत कडाडून विरोध केला होता. मात्र, आता पक्षाची सूत्रे पक्षामधून एकेकाळी कडाडून विरोध झालेल्या प्रफुल पटेल यांच्या ताब्यात गेली आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांच्या पश्चात घडलेल्या घडामोडींना शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याकडे बोट केले होते.
VIDEO | PTI Exclusive: In an interview with PTI CEO & Editor-in-Chief Vijay Joshi, Union Minister Piyush Goyal, when asked about Sunetra Pawar taking oath as Maharashtra’s Deputy Chief Minister following the tragic death of Ajit Pawar, says, “We have an alliance with the NCP… pic.twitter.com/053Hxv7Edj
— Press Trust of India (@PTI_News) January 31, 2026
पियुष गोयल म्हणाले की, महायुतीमध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबत युती आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर NCPच्या आमदारांनी एकत्र येऊन सुनेत्रा पवार यांची पक्षनेते म्हणून निवड केली, आणि त्यामुळे त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या. आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. ते पुढे म्हणाले की, सुनेत्रा पवार या खूप संवेदनशील आणि लोकांसाठी काम करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी त्यांचं काम राज्यसभेत आणि बारामती मतदारसंघात पाहिलं आहे, जिथे त्या लोकांची खूप चांगल्या पद्धतीने सेवा करत आहेत. अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, अजित दादा हे उत्तम प्रशासक, लोकनेते आणि महाराष्ट्रातील जनतेचे लाडके नेते होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी पवार कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण केली आणि सुनेत्रा पवार (वहिनी) यांना त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.