मुंबई : केंद्र सरकारने ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स (Tax On Option Trading) लावल्यामुळे शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरल्याचं (Share Market Crash) दिसतंय. बजेट सादर होताच शेअर बाजार 1900 अंकांनी घसरला होता. नंतर तो हळूहळू सावरताना दिसून आला. असं असलं तरी सर्वसामान्य गुंतवणूक दारांचे मात्र त्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं.
ताजी माहिती मिळेपर्यंत, सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरून तो 81,200 च्या आसपास पोहोचला होता. तर निफ्टीमध्येही 350 हून अधिक अंकांची घसरण होऊन तो 24,950 वर पोहोचला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या लाखो कोटींची चुराडा झाल्याचं दिसून आलं.
अर्थसंकल्पीय भाषण संपताच शेअर बाजारात सेन्सेक्स 1900 अंकांनी घसरून 80,500 वर पोहोचला होता. तर निफ्टी 600 पेक्षा जास्त अंकांनी घसरून 24,900 वर पोहोचला होता. नंतर तो काही प्रमाणात सावरल्याचं दिसून आंल.
आणखी वाचा