Top Flowering Plants for Your Indoor Gallery: वसंत ऋतू म्हणजे निसर्गाचा बदल, रंगाचा उत्सव आणि सुगंधाचा अनुभव घेण्याचा काळ. या ऋतूत हवामान हलके होते. सूर्यकिरणे मृदू असतात. आणि प्रत्येक झाड-पान नव्याने बहरायला लागते.
अशा वेळेस घरातील गॅलरी किंवा लिव्हिंग एरिया सजवायची इच्छा असते. फुलझाडे लावल्यास फक्त घर सुंदर दिसत नाही, तर त्यांचा मंद सुंगध मनालाही ताजेतवाने करतो आणि सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात दरवळतो. चला तर जाणून घेऊयात कोणती फुलझाडे लावावित.
IGNOU 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! IGNOU री-रजिस्ट्रेशनची डेडलाइन पुढे ढकलली; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज मोगरा लावातुम्ही घरात मोगऱ्याच रोप आणून लावू शकता. यावर कळ्या आल्यावरसुद्धा ते खूप सुंदर दिसते आणि फुले उमलताच त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो.
चमेलीचमेलीची फुले खूपच सुगंधी असतात आणि संपूर्ण घर दरवळून टाकतात. तुम्ही मोठ्या कुंडीत याचे झाड लावू शकता. फुले आल्यावर ते दिसायलाही फारच देखणे वाटते.
पारिजाताचे झाडतुम्ही गॅलरीत पारिजातीचे झाड लावू शकता. यावर पांढऱ्या रंगाची आणि नारंगी देठाची फुले येतात. जी पाहायला अप्रतिम दिसतात आणि याचा सुगंधही खूपच छान असतो. जागा असल्यास हे तुम्ही थेट जमिनीतही लावू शकता.
Anti-Aging Diet: सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? आजच आहारातील 'या' 3 पदार्थांना म्हणा टाटा-बाय-बाय! झेंडूचे झाडझेंडू म्हणजेच मेरीगोल्ड याच्या अनेक जाती असतात. पिवळा, नारंगी (केशरी), मरून(चॉकलेटी) अशा विविध रंगाचे झेंडूची रोप तुम्ही पॉटमध्ये लावू शकता. यामुळे तुमच्या घराची गॅलरी अधिक सुंदर आणि आकर्षक दिसेल.