शासकीय रुग्णालयातील २६ वर्षीय निवासी डॉक्टरनं हॉटेलमध्ये संपवलं आयुष्य, वडिलांचा वारंवार मुलाला फोन, नंतर मॅनेजरनं रूमचं दार तोडताच...
तुषार कोहळे February 03, 2026 11:43 AM

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील २६ वर्षीय निवासी डॉक्टरने काल (सोमवारी, ता २) सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Nagpur Crime News) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नुकताच पदव्युत्तर (Nagpur Crime News) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या या तरुण डॉक्टरच्या मृत्यूने वैद्यकीय वतुर्ळात मोठी खळबळ उडाली असून सहकारी डॉक्टरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून गणेशपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.(Nagpur Crime News) 
    
बुलढाणा येथील रहिवासी ऋत्विक सागर ठाकूर (वय २६) असे मृत निवासी डॉक्टरचे (Nagpur Crime News) नाव आहे. त्यानी मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज व के.ई.एम. रुग्णालयातून एमबीबीएस पूर्ण केले होते. दोन्ही पालक डॉक्टर असलेल्या ऋत्विकला नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता आणि २७ जानेवारी २०२६ रोजी तो कॉलेजमध्ये रुजू झाला होता. तो विभागप्रमुख डॉ. दिलीप उमरे यांच्या युनिटमध्ये कार्यरत होते. (Nagpur Crime News) 

सध्या ते गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये राहत होता, तो कॉलेजला न आल्याने डॉ. उमरे यांनी त्यांच्या वडिलांना संपर्क साधला. वडिलांनी वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधण्यात आला. कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ऋत्विक यांनी गळफास (Nagpur Crime News) घेतल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासात कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याची माहिती असून पोलिस विविध अंगांनी चौकशी करत आहेत.

तरुण डॉक्टरच्या मृत्यूने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील २६ वर्षीय निवासी डॉक्टरने सोमवारी सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नुकताच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या या तरुण डॉक्टरच्या मृत्यूने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून हळहळ सहकारी डॉक्टरांमध्ये व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून गणेशपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बुलढाणा येथील रहिवासी ऋत्विक सागर ठाकूर (वय २६) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज व के.ई.एम. रुग्णालयातून एमबीबीएस पूर्ण केले होते. दोन्ही पालक डॉक्टर असलेल्या ऋत्विकला नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता आणि २७ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी कॉलेजमध्ये रुजू झाले होते. ते विभागप्रमुख डॉ. दिलीप उमरे यांच्या युनिटमध्ये कार्यरत होते. सध्या ते गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये राहत होते. सोमवारी ते कॉलेजला न आल्याने डॉ. उमरे यांनी त्यांच्या वडिलांना संपर्क साधला. वडिलांनी वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधण्यात आला. कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ऋत्विक यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.