पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संघाला "अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज" असे नामकरण करण्याचा ठराव नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे.
Kolhapur News : दानोळीमध्ये वारणा नदीत मगरीचा वावर, तत्काळ बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणीदानोळी : येथील वारणा नदीच्या काठावर तांबोळी वतातील परिसरात मोठी मगर रोज गवताच्या कुरणात येऊन पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी शेतकरी, मजूर व मेंढपाळांची नियमित वर्दळ असते. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Donald Trump : भारतावरील आयातशुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्के करणार; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणाLatest Marathi Live Updates 03 February 2026 : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मोदी यांनी रशियाकडून तेलखरेदी बंद करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. तसेच अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार करण्यावर आम्ही शिक्कामोर्तब केले असून, त्यानुसार भारतावरील आयातशुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्के करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच जळगाव येथील सुवर्ण बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोने, चांदीच्या भावात घट होत आहे. चांदीत आज तब्बल ५३ हजारांची घट झाली, तर सोन्यात नऊ हजार ८०० रुपयांची घट झाली. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील चिनी घुसखोरीशी संबंधित कथित माहितीच्या आधारे केलेल्या दाव्यांमुळे लोकसभेत प्रचंड गदारोळ होऊन कामकाज दिवसभरासाठी विस्कळीत झाले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींच्या दाव्यावर जोरदार आक्षेप नोंदविला. याशिवाय देश आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन तसेच मान्सूनविषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी एका क्लिकवर सविस्तर माहिती मिळवा...