February 2026 Festival List: यंदा फेब्रुवारीत महाशिवरात्रीसह साजरे होतील 7 खास सण
esakal February 03, 2026 01:45 PM

Festival Updates 2026: फेब्रुवारी महिना सुरु झाला आहे. फेब्रुवारी महिना हा सणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. संकष्टी चतुर्थी, विजया एकादशी आणि महाशिवरात्रीसारखे प्रमुख सण साजरे होणार आहेत. यासोबतच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आठ दिवसांचा होलाष्टक देखील सुरू होत आहे. फेब्रुवारीत कोणते महत्वाचे सण कोणत्या तारखेला साजरे होणार आहेत हे जाणून घेऊया.

विजया एकादशी


विजया एकादशी हा भगवान विष्णूंना समर्पित सण आहे. हिंदू पंचांगानुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाला साजरा केला जातो. यंदा हा सण 13 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. असं मानलं जातं की युद्धावर जाण्यापूर्वी भगवान रामाने या दिवशी हा व्रत पाळला होता.

संकष्टी चतुर्थी


संकष्टी चतुर्थीचा उपवास ५ फेब्रुवारी रोजी येत आहे. पंचांगानुसार, तो फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जाईल. भगवान गणेशाला समर्पित हे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. तसेच या दिवशी भगवान गणेशाला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करणं सुभ मानलं जातं.

महाशिवरात्री


हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक आहे. असं मानलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता. हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. यंदा हा सण 15 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे.

Horoscope Prediction 2026: नशीब बदलणार! 3 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत, कन्यासह ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाईम सुरु होलाष्टक


होळीच्या सणाच्या आठ दिवस आधी होऊ लागतो. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिवाने क्रोधाने कामदेवाला जाळून भस्म केले. यंदा होलाष्टक 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

फाल्गुन अमावस्या


यंदा हा सण 17 फेब्रुवारी रोजी साजरी केला जाणार आहे. हा दिवस पूर्वजांच्या शांतीसाठी शुभ दिवस मानला जातो. फाल्गुनाची अमावस्या ही वर्षभरात येणाऱ्या 12 अमावस्यांपैकी शेवटची आहे.

आमलकी एकादशी


फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंसह आवळ्याच्या झाडाचीही पूजा केली जाते. याला रंगभरी एकादशी असेही म्हणतात. यंदा 27 फेब्रुवारीला हा सण साजरा केला जाणार आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.