Jowar Snacks: ऑफिसमध्ये काहीतरी क्रिस्पी खावंसं वाटतंय? मग डब्ब्यात ठेवा ज्वारीच्या पिठाचे 5 चविष्ट स्नॅक्स
esakal February 06, 2026 04:45 AM

Jowar Snacks Are Ideal for Office: ऑफिसमध्ये काम करताना अचानक काहीतरी क्रिस्पी आणि टेस्टी खाण्याची इच्छा अनेकांना होते. अशा वेळ पॅकेजिंग फूड न खाता तुम्ही पौष्टिक आणि घरच्या घरी बनवलेले स्नॅक्स असतील, तर आनंद द्विगुणित होतो. ज्वारीच्या पिठाचे स्नॅक्स हे केवळ स्वादिष्टच नसून, आरोग्यसाठीही फायदेशीर असतात. चला तर मग पाहूया ५ सोपे आणि चविष्ट ज्वारी स्नॅक्स

ज्वारीची टेस्टी गोड पुरी

ज्वारीच्या पिठाची पुरी बनवण्यासाठी यात पिठी साखर आणि गव्हाच्या पीठ मिक्स करून मऊ मळून घ्या आणि लहान आकाराचे गोल पुऱ्या करून ते मंद आचेवर तळा. तसेच तुम्ही सायंकाळी चहा सोबत ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता आणि ऑफिसमध्ये सहज बॅगमध्ये ठेवता येतात.

Momos Scam: मोमोजची आवड पडली महागात; कुटुंबाने गमावले तब्बल 85 लाखांचे दागिने कुरकुरीत खमंग चकल्या

ज्वारीच्या पिठात तिखट मसाले आणि हळद मिसळून बनवलेल्या चकल्या खूप कुरकुरीत होतात. दुपारी चहासोबत छान लागतात. यात पोषणमूल्य जास्त आहेत.

ज्वारीच्या पिठाचे क्रॅकर्स

ज्वारीचे पीठ त्यात जिरे, ओवा, चवीनुसार मीठ, तीळ, हळद, चाट मसाला, गरम मसाला एकत्र मिक्स करून घ्या. आणि ते मळून चपाती सारखं लाटून त्याचे बारीक कट करून तेलात मंद आचेवर तळा. ऑफिस मध्ये स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी परफेक्ट डिश आहे.

ज्वारीची बेसन-संयुक्त लाडू

ज्वारीच्या पिठासोबत बेसन आणि गोडी मिसळून लहान लाडू तयार करता येतात. याने आपल्या शरीराला एनर्जी बूस्टर मिळते. आणि ऑफिसमध्ये हलके स्नॅक

ज्वारीच्या पिठाचे मिक्स्ड नट्स बिस्कीट

ज्वारीच्या पिठात बदाम, काजू, खसखस किंवा तिळ मिसळून हाताला लागणारे बिस्कीट बनवता येतात. हे क्रिस्पी आणि पौष्टिक आहेत. दिवसभर काम करताना ताकद वाढवतात

Crispy Mirchi Vada Recipe: क्रिस्पी मिरची वडे खायचे आहे का? घरच्या घरी बनवा 5 मिनिटांत 'या' सोप्या पद्धतीने बनवा! टाकाऊ टिप्स

ज्वारीचे पिठ ताजे वापरा, जेणेकरून कुरकुरीतपणा टिकतो.

स्नॅक्स बेक किंवा हलक्या तळण्याने बनवा, जेणेकरून ते आरोग्यदायी राहतात.

ऑफिसमध्ये संध्याकाळच्या चहा/कॉफीसोबत हे स्नॅक्स खाल्ले तर मजा दुपटीने वाढते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.