आयुष्यात चांगला जीवनसाथी किंवा प्रेमसाथी मिळणं ही मोठी देणगी मानली जाते. समजूतदार, प्रेमळ आणि साथ देणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं. मात्र, दुर्दैवाने प्रत्येकाच्याच नशिबी असा जोडीदार येतोच असं नाही.
अनेक वेळा नात्यात तणाव, दुर्लक्ष, राग आणि हिंसाचारसुद्धा पाहायला मिळतो. आज आपण अशाच लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, जे खूप रागीट आणि हट्टी स्वभावाचे असतात.
कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 4 मानला जातो. या मूलांकावर राहू ग्रहाचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. अंकशास्त्रानुसार, अशा व्यक्ती कधी कधी अतिशय क्रूर, हट्टी होऊ शकतात.
हे लोक आपल्या पार्टनरचं म्हणणं ऐकण्याऐवजी स्वतःचीच मर्जी चालवतात. जिद्दी स्वभावामुळे ते जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित करतात आणि काही वेळा अन्यायकारक वर्तनही करतात असं अंकशास्त्रात म्हटलं आहे.
अंकशास्त्रानुसार, 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असलेले लोक आपल्या ध्येयपूर्तीसाठी इतके झपाटलेले असतात की ते पार्टनरकडे दुर्लक्ष करू लागतात. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो आणि जोडीदाराला एकटं वाटू लागतं.
प्रिय वाचकांनो, ही बातमी फक्त माहिती आणि जनजागृतीच्या उद्देशाने लिहिण्यात आली आहे. यामधील माहिती सामान्य अंकशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहे. या दाव्यांची कोणतीही वैज्ञानिक पुष्टी नाही. कृपया याकडे अंधश्रद्धेने पाहू नये किंवा वैयक्तिक निर्णयांचा आधार म्हणून वापरू नये.