वडिलांसोबत मतदानाला गेलेल्या मुलानं दाबलं ईव्हीएमचं बटन; अकलूजच्या यशवंतनगर मतदान केंद्रावर धक्कादायक प्रकार, उमेदवार वडिलांचं अजब उत्तर
सुनील दिवाण, एबीपी माझा February 07, 2026 01:13 PM

Akluj ZP Election 2026: राज्यभरात आज (7 फेब्रुवारी) जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मतदानाची (ZP and Panchayat Samiti Elections 2026) रणधुमाळी पार पडत आहे. सकाळपासूनच मतदानकेंद्रावर मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. अशातच अकलूजच्या यशवंतनगर मतदान केंद्रावरून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषद उमेदवार अर्जून सिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या लहान मुलाने व्हीएमचं बटन दाबले आहे.

दरम्यान, याबाबत अर्जुन सिंग मोहिते पाटील यांना विचारले असता ते म्हणाले 'मुलाला पाहायचे होते कि मतदान कसे करतात, म्हणून त्याला सोबत आत नेले होते' या अजब उत्तरानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहे. दरम्यान अधिकाऱ्यांच्या समक्ष हा प्रकार घडलाय. यावर आक्षेप घेतला नाही का विचारल्यावर अर्जुन सिंग मोहिते पाटील म्हणाले, कि अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मतदाराशिवाय इतर कुणालाही मशीनपर्यंत जाण्या परवांगी नसते, अशातच हा प्रकार घडलाय. त्यामुळे या प्रकारामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Akluj ZP Election 2026: चुकीचे बटन दाबल्यामुळे मशीन बंद, तासभर खोळंबा

दुसरीकडे, अकलूजमधील एका केंद्रावर चुकीचे बटन दाबल्यामुळे मशीन बंद झाल्याची घटना घडलीय. सकाळच्या सुमारास अर्ध्या तासापासून लोके रांगेत उभे राहीले असताना बराच वेळ मशीन सुरू झाले नसल्याचे चित्र होतं. दरम्यान, जवळपास एक तासानंतर मशीनची दुरुस्ती झाली. अकलूज येथील यशवंतनगर मतदान केंद्रावर हा प्रकार घडला असून बराच वेळेच्या खोळंबा झाल्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. अकलूज येथील यशवंत नगर मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने महिला मतदान केंद्र बनविले असून येथे सर्व कर्मचारी या महिला आहेत. मतदान केंद्राबाहेर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आले असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे विविध प्रकार निवडणूक विभागाने केले आहेत. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यात 68 जागांवर मतदार होत असून या निवडणुकीत ग्राम विकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील यांचे प्रतिष्ठापनाला लागली आहे.

Parbhani Election 2026: मतदान केंद्रावर उमेदवाराच्या पतीने नारळ फोडून केली पूजा

परभणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे उमेदवारांच्या पतीने मतदान केंद्रावर नारळ फोडत पूजा केली आहे. पंचायत समितीच्या उमेदवार असलेल्या उर्मिला गोविंद डोने यांचे पती गोविंद डोने यांनी चक्क मतदान केंद्रावर येत नारळ फोडून गुलाल लावत पूजा केली आहे.जो चर्चेचा विषय ठरलाय.

हे देखील वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.