मी मूळ परिंचे गावची असून बारामती येथे संगणकीय अभियंता म्हणून शिक्षण घेत आहे. हे माझं पहिलं मतदान आहे आणि मला खूप अभिमान वाटतोय. लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचं असतं म्हणून मी माझी जबाबदारी पूर्ण करायला आले आहे. जे कोणी उमेदवार भविष्यात निवडून येतील त्यांनी गाव व परिसरात चांगले रस्ते, स्वच्छता, नियमित पाणी पुरवठा, रोजगार संधी आणि कौशल्य व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सुरक्षा, शिक्षण आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण असेल तरच खरा विकास होईल.
- ऋतुजा रमेश जाधव, परिंचे (ता. पुरंदर)