T20 World Cup : मला सूर्या भाईचा फोन आला अन्...; हर्षित राणा संघातून बाहेर पडताच पडद्यामागे काय घडलं? सिराजने सांगितला 'तो' किस्सा, पाहा VIDEO
esakal February 08, 2026 08:45 PM

टी-२० विश्वकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा पराभव केला आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने तीन गडी बाद करत दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे या सामन्याच्या 48 तासांपूर्वीपर्यंत मोहम्मद सिराज हा भारतीय संघाचा भाग देखील नव्हता. ऐनवेळी त्याची संघात एन्ट्री झाली आणि त्याने उत्कृष्ट कागिरीरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

या सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना सिराजने भारतीय संघातील समावेशापूर्वीचा एक किस्साही सांगितला. तो म्हणाले, ''वर्ल्ड कप सुरु होण्याच्या एक दिवस आधी मला कर्णधार सूर्यकुमार यादवचा फोन आला होता. सूर्याभाई म्हणाला, मिया बॅक पॅक कर आणि मुंबईला ये, पण त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. मी त्यालाही म्हणालो, उगाच मस्करी करू नको, असो होऊ शकत नाही. त्यावर तो म्हणाला की खरच सांगतोय.''

बाजूला व्हा... नो फोटो प्लीज! Sanju Samson साठी सूर्यकुमार बनला अंगरक्षक; केरळमध्ये पोहोचताच असा का वागला? Video Viral

पुढे सिराजने सांगितलं की ज्यावेळी सिलेक्शन कमिटीतून प्रज्ञान ओझाचा मला फोन आला, त्यावेळी मला या गोष्टीवर विश्वास बसला. ही माझ्यासाठी धक्कादायक बाब होती. शेवटी जे नशिबात असतं तेच होतं. ते बदलू शकत नाही. टी-२० विश्वकप खेळ माझ्या नशीबात होतं. त्यानुसार मी संघात आलो आणि पहिला सामना सुद्धा खेळलो, अशी प्रतिक्रियाही त्याने दिली.

१८ चौकार, ३ षटकार! जडेजाच्या नाबाद १६५ धावांच्या खेळीने संघ फायनलमध्ये पोहोचला, २९२ धावांचे लक्ष्य सहज केले पार...
View this post on Instagram

A post shared by TejPartap Yadav (@ty_vlogs47)