Maharashtra Political Live: अजितदादांचे निधन; रोहित पवार आज काय मुद्दे मांडणार
Sarkarnama February 21, 2026 03:45 PM
नागपूर : बारावी परीक्षेचे दोन पेपर फुटले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे, याप्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. Rohit Pawar: रोहित पवार आज काय नवीन खुलासा करणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत. रोहित पवार काय नवीन खुलासा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित पवारांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर रोहित पवारांनी सातत्याने नवनवीन मुद्दे मांडत या अपघातावर शंका उपस्थित केली आहे.

मोदी 'ब्लॅकमेल' होत आहेत - प्रकाश आंबेडकर

मुंबईत ज विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक पार पडली. 'एपस्टीन फाईल्स'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव समोर आल्याचा आरोप आणि त्यातून निर्माण झालेली देशाची सुरक्षा व सार्वभौमत्वापुढील आव्हाने, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मोदी 'ब्लॅकमेल' होऊन हे करार करत आहेत, गंभीर आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

विरोधी पक्षनेत्यांविना अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार

राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार(ता.23) पासून सुरू होणार आहे. 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. मात्र, विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांविना हे अधिवेशन पार पडणार आहे.

काँग्रेस आमदाराला बिश्नोई गँगची खंडणीसाठी धमकी

कोला पश्चिम मतदारसंघातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून तब्बल १० कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनाही धमकी मिळाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सुरक्षीततेच्या दृष्टीने एवढ्या महत्वपूर्ण घटना घडूनही अकोला पोलिसांनी याबाबत माहिती देण्याचे टाळले.

पराभूत 'स्वीकृत' नगरसेवक नाही, काँग्रेसचा निर्णय

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत ज्यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेऊ नका, असा निर्णय प्रदेश काँग्रेस कमेटीने घेतला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संघर्षामुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्ता गमावावी लागली होती.

Sanjay Raut : संजय राऊत नाशिक दौऱ्यावर, मालेगाव कोर्टात हजर राहणार

खासदार संजय राऊत उद्या नाशिकचा दौरा करणार आहे. मालेगाव कोर्टातील सुनावणीला ते उपस्थित राहतील अशी माहिती आहे. मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांविरोधात अवमान याचिका कोर्टात दाखल केली होती. याप्रकरणी मालेगाव कोर्टात सुनावणी होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.