भारताची बदनामी राहुल गांधी व कॉग्रेस पार्टी करत असल्याचा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चा कडून नागपूरात आंदोलन
राहुल गांधींचा अर्धनग्न फोटो हातात घेऊन आंदोलन
नागपूरच्या टिळक पुतळा परिसरात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन
काँग्रेस पक्ष, राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी
राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा - रोहित पवार संतांच्या पादुका लातूरमध्ये हेलिकॉप्टरने दाखलसंत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम संत नामदेव, संत मुक्ताबाई , या संतांच्या पादुका लातूरमध्ये दाखल.
उत्सव संतांचा कुंभमेळावा वारकऱ्यांचा या भक्तिमय कार्यक्रमासाठी संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने लातूरमध्ये दाखल झाले आहेत, लातूर शहरातून खंडापूर कार्यक्रमास स्थळाकडे या पादुका मार्गस्थ होतील.
महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडलीमहाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या बैठकीत गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
वाघोलीत होणारी ही स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरणार असून, जिल्ह्यासह राज्यभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सौर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महावितरणवर प्रशासनाला धरले धारेवर६ महिन्यांपासून सौर ग्राहकांना चुकीची वीज बिले देऊन छळणाऱ्या महावितरणने कहर केला असून . थकबाकीच्या नावाखाली पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर प्रणालीद्वारे सुमारे १०० ग्राहकांचा वीजपुरवठा आपोआप खंडित करण्यात आला. या कारवाईमुळे सरकारी वसतिगृहे, रुग्णालये आणि शेकडो घरे अंधारात बुडाली असून, संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला.
Solapur: उजनी धरण पंचवीस दिवसात शंभरीवरून 75 टक्क्यावरसोलापूर जिल्ह्याची वरदायीनी असणाऱ्या उजनी धरणातून गेल्या 25 दिवसात 25 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. तब्बल 13 टीएमसी पाणी हे जिल्ह्यातील शेतीसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी , कालवे हे दुधडी वरून वाहत आहेत. 25 जानेवारीला शंभर टक्के असणारे धरण आज मात्र 75 टक्क्यावर आले. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भीमा नदी आणि कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
Nagpur: बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटले, नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलबारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटले, नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
व्हाट्सअप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना मिळाली माहिती.
बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हाट्सअप वर आल्याची माहिती
गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता मात्र परीक्षा आधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर आला होता, सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आले आहे
सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती त्यामुळे केंद्रावरील प्रेक्षकांना संशय आला
तिची शिक्षकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला तो तपासला असता त्यामध्ये एका व्हाट्सअप ग्रुप वर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला होता
केंद्रप्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला
Nanded: नांदेडमध्ये डांबरी रस्ता चक्क हाताने उखडत असल्याचा प्रकार उघडनांदेडच्या किनवट तालुक्यातील परोटी ते रिठा या गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात येणारा डांबरी रस्ता चक्क हाताने उखडत असल्यास चा प्रकार उघड झाला आहे. या गावातील ग्रामस्थांनी हा डांबरी रस्ता चक्क हाताने उखडून दाखवून या रस्त्याच्या कामाचा दर्जा उघड केला आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून चांगल्या दर्जाचा रस्ता बनवून देण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.
Pawna: पवना धरणात बुडून पिंपरीतील एका तरुणाचा मृत्यू...पवना धरणात बुडून पिंपरीतील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ऋतिक कैलास साखरे वय 24 राहणार काळेवाडी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या सात मित्रांसह पवनाधरण परिसरात फिरायला आला होता. सातही मित्र नदीच्या पात्रात उतरून पोहू लागले मात्र जलाशयात उतरलेल्या ऋतिक पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागल्याने पाहून मित्रांनी मदतीसाठी आरडा ओरड केला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. स्थानिकांनी आणि मित्रांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना संपर्क साधत लोणावळा पोलिसांनी सोबत संपर्क साधला. पोलिसांनी शिवदुर्ग मित्र बचाव कार्य पथकाला प्रचारण केले. वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र मंडळांनी ऋतिक चा मृतदेह बाहेर काढला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पिंपरीला पाठवण्यात आला.. अधिक तपास लोणावळा पोलीस करीत आहे...
Raigad: रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता समीकरणाला येणार वेगरायगड जिल्हा परिषद मध्ये सत्ता समीकरणाला वेग येत असून भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची सध्या जोरदार हालचाल सुरू आहे. दोन्ही पक्षाचे विजयी उमेदवार सध्या गोव्यात एका आलिशान हॉटेल मध्ये असल्याची माहिती समोर आलीय.या व्हायरल फोटोत दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते असल्याचं दिसून येतंय.मात्र सर्वाधिक जागा जिंकून सत्तेपासून दूर राहिलेल्या शिंदे शिवसेनेला मित्र पक्षाकडून एकाकी पाडण्यासाठी ही खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलीय शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी आम्हाला सोबत न घेतल्यास पुढील निवडणुकीत वेगळा विचार करू असा इशारा भाजप आणि राष्ट्रवादीला दिलाय त्यामुळे रायगड मधील जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापन समीकरणात कोण अध्यक्ष पदावर बसतोय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय.
भीमा नदी पात्रात उजनी धरणाच्या पाणी सोडण्यावरून भाजप आणि काँग्रेस पक्षात श्रेयवादाची लढाईदक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदी पात्रात उजनी धरणाच्या पाणी सोडण्यावरून भाजप आणि काँग्रेस पक्षात श्रेयवादाची लढाई
उमराणी बंधारात पाणी अडवल्यामुळे भीमा नदी पात्र कोरडे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीचा आणि पाण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी.
राज्य सरकारकडून उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याचे आदेश काढल्याचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून स्वागताचे पोस्टर..
तर खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून 14 फेब्रुवारी रोजी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी अधीक्षक अभियंत्याला पत्रावरून श्रेया घेण्याचा प्रयत्न.
कर्नाटक सरकारने उमराणी बंधाराची उंची वाढवल्यामुळे उजनी धरणातून सोडलेले पाणी तिथे अडवण्यात आले त्यामुळे भीमा नदी पात्र कोरडे पडले.
याचा फटका दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या गावांना बसला.
त्यामुळे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदारांकडून उजनी धरणातून भीमा पात्रात पाणी सोडण्याची करण्यात आली होती मागणी..
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखलउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी अचानक आल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी मध्ये महायुतीतच त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सत्तेमध्ये कोण येणार ही उत्सुकता सातारा जिल्हा वाशीयांना लागून राहिली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 27 राष्ट्रवादीला 20 तर शिवसेनेला 15 अशा जागा मिळाल्याने सत्तेसाठी असणारा 33 आकडा जुळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकवटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान भाजपाकडूनही जिल्हा परिषदेवर अध्यक्ष पदाचा दावा केला जात असल्याने अजूनही तीनही पक्षांच्या भूमिका गुलदस्तात आहेत. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर भाजपच्या मंत्र्यांनी केलेल्या टिके मुळे दोन्ही पक्षांमध्ये नाराजी आहे. याबाबत रात्री अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यात दरेगावी मुक्कामी आले आहेत त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच संपणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
MNREGA: मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील मजुरांना होळीपूर्वी राज्य शासनाकडून मोठा दिलासा...मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील मजुरांना होळीपूर्वी राज्य शासनाकडून मोठा दिलासा...
प्रलंबित असलेल्या मजुरीसाठी राज्य शासनाकडून 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर..
पुढील दोन ते तीन दिवसात मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा होणार...
तसेच मार्च अखेर पर्यंत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होऊन मजूरीही वेळेत दिली जाणार...
मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीची रक्कम थकीत असल्याने आदिवासी बांधवांचा महत्त्वाचा होळी सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न मजुरांपुढे होता.
मात्र आता राज्य शासनाकडून मजुरांना दिलासा देण्यात आलाय.
SSC Exam: दहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी 11 कॉपी बहाद्दरांवर कारवाईदहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी 11 कॉपी बहाद्दरांवर कारवाई
पहिल्याच दिवशी प्रशासनाने 11 कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडले
दहावीच्या परीक्षेला काल पासून सुरुवात
प्रशासनाकडून राज्यभर कॉपीमुक्त परीक्षेचे अभियान
मात्र काल पहिल्याचा दिवशी पुणे विभागीय मंडळात 10 तर नागपूर विभागीय मंडळात 1
अशा एकूण 11 विद्यार्थ्यांवर कॉपी केल्यामुळे कारवाई करण्यात आल्याची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती
Pune: पुण्यात भंगाराच्या दुकानाला आगपुण्यात भंगाराच्या दुकानाला आग
पुण्यातील बोपोडी मधील छाजेड पेट्रोल पंपाजवळ भंगारच्या दुकानात आगीची घटना
अग्निशमन दलाकडून 3 फायर गाड्या घटनास्थळी दाखल
आग विजवण्याचे काम सुरू असून आग कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील आज चिखला काकड गावात जाणारमराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज चिखला काकड गावात जाणार
काल रात्री लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात महापुरुषांच्या पुतळ्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला होता.
चिखला काकड गावामध्ये एका महिलेला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचं समोर आल आहे..
या महिलेला भेटण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज चिखला काकड गावात जाणार आहेत...
सकाळी दहा वाजता मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून चिखली काकड गावाकडे रवाना होतील
Pune: पुण्यातील गुलटेकडी परिसरात गोळीबारपुण्यातील गुलटेकडी परिसरात गोळीबाराची घटना
अल्पवयीन सराईत आरोपीने गोळीबार केल्याची माहिती
दोन ते तीन राऊंड फायर केले असल्याची पुणे पोलिसांकडून प्राथमिक माहिती
दोन गटातील वादातून गोळीबार झाला असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती
आरोपीकडून परिसरात भीतीच वातावरण पसरवण्यासाठी हवेत गोळीबार
Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात 893 शिक्षकांची पदे रिक्तयवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची संच मान्यता मंजूर झाली आहे त्यानुसार जिल्ह्यात मुख्याध्यापक, शिक्षकांची जवळपास 893 पदे रिक्त आहेत यातील बहुतांश जागा पेशा क्षेत्रातील आहे त्यामुळे पेशा क्षेत्र वगळता उर्वरित खुल्या सर्वसाधारण जागेच्या पदभरतीला नव्याने मंजुरी मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.
नागपूर महानगरपालिकामध्ये वाढीव पाणी बिलांबाबत तातडीची बैठकनागपूर शहरातील 25 हजारांहून अधिक नागरिकांना ऑरेंज सिटी वॉटर (OCW)कडून वाढीव बिले प्राप्त नागरिकांमध्ये तीव्र संताप.
महापौर निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ बिल दुरुस्तीचे दिले निर्देश.
आमदार प्रवीण दटके यांनी मीटर चोरी आणि पाचपट बिलवाढीचा मुद्दा केला उपस्थित.
दूषित पाण्याच्या तक्रारी सात दिवसांत निकाली काढण्याचे आदेश.
वाढीव देयकांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश.
उपमहापौर, नगरसेवक व संबंधित अधिकारी बैठकीस उपस्थित नागरिकांच्या हितासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन
सुधारणा न झाल्याने डिसेंबर जानेवारीत एकूण ७ कोटींचा दंड.
बिल दुरुस्ती न झाल्यास सतरंजीपुरा, गांधीबाग व धंतोली झोन कार्यालयांना कुलूप ठोकण्याचा इशारा
Bharat Gogawale: भाजप, राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती, म्हणून गोव्याला सदस्य हलवले,मंत्री भरत गोगावलेंचा टोलारायगड जिल्हा परिषदेचे भाजप आणि राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित सदस्यांना गोव्याला पाठवण्यात आले आहे. यावर बोलताना आम्ही त्यांचे सदस्य उचलू अशी भिती त्यांना असेल अस सांगताना आम्ही एकतरी सदस्य हलवला का असा खोचक प्रश्न रूपी टोला गोगावले यांनी लगावला आहे. याचवेळ राष्ट्रवादी भाजप युतीवर बोलताना आम्हाला दूर ठेवलं, तर पुढे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत, शिवसेनेची गरज लागेल, तेव्हा आम्ही पाहू काय करायचं ते असा गर्भित इशाराही गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादीला दिला आहे. रायगडमध्ये सद्या जिल्हा परिषदेच्या सत्ता समिकरणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी, भाजपमध्ये वाद सुरु आहेत.
Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात 38 हजारांवर विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षायवतमाळ जिल्ह्यात 8 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणारी शिष्यवृत्तीची परीक्षा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा मुळे 22 फेब्रुवारी रोजी होताहेत. 284 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे या परीक्षेला जिल्ह्यात तब्बल 38 हजार 278 विद्यार्थी बसणार असून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देण्यात आल्या आहेत.तसेच त्यांना परीक्षा घेण्यासंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले असून शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषद प्रशासनाने सेस फंडातून भरले आहे.त्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे इत्या पाचवीची विद्यार्थी संख्या 25 हजार 485 तर इयत्ता आठवीची विद्यार्थी संख्या 14 हजार 278 इतकी आहे.
Nashik: नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरीनाशिक -
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
बागलाण तालुक्यातील मुल्हेर परिसरात संध्याकाळ च्या सुमारास पावसाने लावली जोरदार हजेरी
दुपार पासून आकाशात ढगाळ वातवरण निर्माण झाले होते
संध्याकाळी अचानक जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकरी धास्तावला
कांदा, गहू,सह अन्य पिकांना फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांना वर्तवली आहे.